शहरं
Join us  
Trending Stories
1
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
2
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
3
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
4
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
5
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
6
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
7
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
8
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
9
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
10
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
11
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
12
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
13
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
14
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
15
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
16
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
17
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
18
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
19
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
20
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान

१२७ आदिवासी मुलांच्या जीवनात आणला शिक्षणाचा प्रकाश, अनंत झेंडे यांचे कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 1:01 PM

रक्ताचे नाते असलेल्या मुलांचा सांभाळ प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतो; पण ज्यांना रक्ताच्या नात्यातील कोणीच नाही वा नात्यातील कोणी सांभाळ करीत नाही, अशा मुलांचे काय? या मुलांना आपले समजून अख्खे जीवन त्यांच्याचसाठी घालविणारा ‘बाप माणूस’देखील आपल्यामध्येच असतो. अशा बाप माणसाला ‘फादर्स डे’निमित्त ‘लोकमत’चा सलाम!

बाळासाहेब काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कश्रीगोंदा : महामानव बाबा आमटे यांच्या विचाराची शिदोरी घेऊन समाजसेवेच्या विश्वात रममाण झालेले श्रीगोंदा येथील अनंत अच्युतराव झेंडे हे १२७ आदिवासी मुलांचा सांभाळ करीत आहेत. त्यांचे राहणे, खाणेपिणे, शिक्षण ही सर्व जबाबदारी ते पार पाडत आहेत. महामानव बाबा आमटे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी मुलांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश आणला आहे. अनंत झेंडे यांचे मुळगाव नगर- दौंड रस्त्यावरील चिखली होय. लहानपणापासून समाजसेवेची आवड. बारावीपर्यंतच शिक्षण घेतले. २००५ मध्ये ज्ञानदीप शिक्षण संस्थेत शिपाई म्हणून काम सुरू केले. त्याअगोदर २००२ मध्ये भारतसेवक डॉ. एस. एन. सुब्बाराव यांच्याकडे श्रमसंस्काराचे धडे घेतले. आनंदवनमध्ये उन्हाळी शिबिरे केली. यामुळे समाजसेवा नसानसात भिनली.

त्यातूनच श्रीगोंदा तालुक्यातील आदिवासी, गोरगरीब मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा विचार मनात आला. अनेक मुले दूर राहत असल्याने ते शिक्षणापासून वंचित राहतात. असे लक्षात आल्यानंतर झेंडे यांनी श्रीगोंदा शहरातच मुलांची राहण्याची व्यवस्था केली तर त्यांना तेथेच शिक्षणही घेता येईल. याच भावनेतून २००८ मध्ये शहरातील कुलकर्णी वाड्यात महामानव बाबा आमटे सेवाभावी संस्था या नावाने सहा मुलांना घेऊन त्यांनी वसतिगृह सुरू केले. २०१३ मध्ये शेतकरी कुटुंबातील कन्या शुभांगी हिच्याबरोबर अनंत झेंडे यांचा विवाह झाला. पुढील कार्यासाठी त्यांना पत्नीचीही साथ मिळू लागली. 

संस्था स्थापन होऊन १२ वर्षाचा कालावधी लोटला. आता या वसतिगृहात ९५ मुले, ३२ मुली अशा १२७ आदिवासी मुलांना आधाराची सावली मिळाली आहे.  या कामात झेंडे यांच्या मागे आमटे परिवार, गिरीश कुलकर्णी, शिला संचेती, मृणाल राडकर, नरेंद्रभाई मिस्त्री, डॉ. प्रकाश बोरा, सतीश बोरा, डॉ. अरुण रोड, अनिल गावडे, उद्धव गायकवाड हे भक्कमपणे उभे राहिले. त्यामुळे संस्थेची मांडवगण रस्त्यावर घुगलवडगाव शिवारात सहा एकर जागेवर संस्थेचा जानकीबाई बजाज नावाने मोठा प्रकल्प उभा राहिला आहे. प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. आता येथील सावलीत आदिवासी मुले स्थिरावली आहेत.

 

आता मदतीपेक्षा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मदत करणे महत्त्वाचे आहे. भविष्यात संस्थेतील मुलांना सकस आहार, दर्जेदार शिक्षण, स्वावलंबी जीवन जगण्याचा गुरूमंत्र देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. -अनंत झेंडे,संस्थापक, महामानव बाबा आमटे विकास सेवा संस्था 

 

स्वेच्छा निवृत्त अधिकाºयांचे गौडबंगाल? ४थोरात महसूलमंत्री असताना मागील कार्यकाळात खासगी सचिव असलेले सेवानिवृत्त अधिकारी पुन्हा कार्यालयात कसे दिसतात? त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. मागील पाच वर्षे हे अधिकारी घरी होते. आता पुन्हा मंत्री झाल्यानंतर हेच अधिकारी थोरातांच्या कार्यालयात काय करतात? प्रशासनात चांगले अधिकारी नाहीत का? स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या अधिकाºयांना पुन्हा घेण्याचे गौडबंगाल काय आहे, हे जनतेला कळू द्या, असेही विखे म्हणाले.