अहमदनगर : महापालिकेच्या कोळी चाचणी केंद्रात सर्वांचे नमुने घेण्यासाठी खाजगी डॉक्टर न आल्याने येथील कामकाज मंगळवारी दुपारी ठप्प झाले.
महापालिकेने रामकरण सारडा येथील वस्तीगृहात कोविड चाचणी केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात स्वाबचे नमुने घेण्यासाठी पाच खाजगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहित केलेली आहे. सोमवारी धनंजय कुलकर्णी (खाजगी डॉक्टर) चाचणी केंद्रात आले होते.
त्यांनी ५० जणांचे नमुने घेतले. मंगळवारी महापालिकेच्या कर्मचाºयांनी पन्नास जणांचे फॉर्म भरून घेतले. तसेच त्यांचा ओटीपी नंबर आला. ही सर्व तयारी झाल्यानंतर तेथील आरोग्य अधिकाºयांनी संबंधित डॉक्टरांना फोन करून बोलविण्याचा प्रयत्न केला. परंतु एकही डॉक्टर येण्यास तयार झाले नाही. त्यामुळे स्त्रावाचे नमुने कोणी घ्यायचे ? असा प्रश्न निर्माण झाला.
महापालिकेच्या कर्मचाºयांना स्त्रावाचे नमुने घेण्याच्या सूचना वरिष्ठांकडून करण्यात येत आहेत. मात्र त्यांनीही नमुने घेण्यास नकार दिला आहे. महापालिकेच्या चाचणी केंद्रातील कामकाज मंगळवारी दुपारनंतर ठप्प झाले.