या दोन्ही कामांना शनिवारी भेट देऊन कानडे यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच ग्रामीण रुग्णालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन १५ ऑगस्टपूर्वी रुग्णालय ऑक्सिजनच्या पुरवठ्यासह सुरू करण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या.
ऑक्सिजन प्रकल्पासाठी २०० केव्ही क्षमतेचा जनरेटर बॅकअप, नवीन इमारतीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह अशा बदलासह रुग्णालय इमारत बांधण्यात येत आहे. इमारत पूर्ण होऊन तेथे सर्व साधनसामग्री १० ऑगस्टपूर्वी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. २५ खाटांचा स्वतंत्र बालकांसाठीचा कक्षही उभारण्यात येत आहे, अशी माहिती कानडे यांनी दिली.
प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक संजय सानप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश बंड यावेळी उपस्थित होते. उपनगराध्यक्ष करण ससाणे, ज्येष्ठ नेते इंद्रभान थोरात, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, विष्णुपंत खंडागळे, सतीश बोर्डे, आबा पवार आदी उपस्थित होते.
----
फोटो ओळी : कानडे
आमदार लहू कानडे यांनी ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्पाची पाहणी केली.