शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

सीईटी परीक्षेबाबत धोरण ठरविण्याचे काम सुरू; प्राजक्त तनपुरे यांचे स्पष्टीकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:11 PM

राज्यातील कोरोनाची सध्याची स्थिती पाहता पदवी परीक्षा घेणे केवळ अशक्य आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून केंद्राने, तसेच यूजीसीने आपला निर्णय बदलून या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब करावे, असे स्पष्ट करीत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षांबाबत धोरण ठरविण्याचे काम सुरू आहे. कोरोनाची स्थिती पाहून त्याबाबतही लवकरच निर्णय होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. 

लोकमत संवाद

अहमदनगर : राज्यातील कोरोनाची सध्याची स्थिती पाहता पदवी परीक्षा घेणे केवळ अशक्य आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून केंद्राने, तसेच यूजीसीने आपला निर्णय बदलून या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब करावे, असे स्पष्ट करीत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षांबाबत धोरण ठरविण्याचे काम सुरू आहे. कोरोनाची स्थिती पाहून त्याबाबतही लवकरच निर्णय होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्रीप्राजक्त तनपुरे यांनी दिली. 

मंत्री तनपुरे यांनी शनिवारी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली असता, त्यांनी परीक्षांबाबत भाष्य केले. राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. पदवी परीक्षा घेण्याबाबत सर्व दृष्टीने सखोल आढावा घेण्यात आला. विद्यार्थी संघटना, महाविद्यालयांचे प्राचार्य, विअिवध विद्यापीठांचे कुलगुरू यांच्याशी चर्चा केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही परीक्षा न घेण्याबाबत मते मिळाली. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांमध्येही याचा उल्लेख होता की, राज्यांनी कोरोनाची स्थानिक स्थिती पाहून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालावरून, राज्य शासनाच्या संमतीने परीक्षांबाबत निर्णय घ्यावा. त्या अनुषंगाने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थांनाही परीक्षा न घेण्याबाबत आम्ही विनंती केली. आता हा विषय न्यायालयातही गेला आहे. त्यामुळे केंद्राने किंवा यूजीसीने विद्यार्थीहिताचा, त्यांच्या आरोग्याचा विचार करता परीक्षा घेण्याचा आपला अट्टाहास सोडला पाहिजे, अशी अपेक्षा तनपुरे यांनी व्यक्त केली. 

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार राज्यात सप्टेंबरअखेरपर्यंत परीक्षा घेण्यासारखी स्थिती नाही. सध्या विविध कॉलेज, संस्था कोरोना सेंटरसाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने ते परीक्षेला येणार कसे, राहणार कोठे अशी सर्व गोंधळाची परिस्थिती आहे. त्यामुळे सप्टेंबरनंतर परीक्षा घेऊच शकत नाही. किती दिवस विद्यार्थ्यांच्या डोक्यावर परीक्षांची टांगती तलवार ठेवणार? सरासरी गुण, अंतर्गत मूल्यमापनावरून निकाल जाहीर करण्याचा पर्याय राज्याने दिला आहे. त्यामुळे केंद्राने यावर अंतिम निर्णय घेऊन हा गोंधळ थांबवला पाहिजे, असेही तनपुरे यांनी सूचवले. 

बारावी परीक्षांचे निकाल लागले असून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रता परीक्षा घेण्याबाबत शासनाचे काय धोरण आहे, यावर विचारले असता, तनपुरे म्हणाले, याबाबत मागील महिन्यात सीईटी आयुक्तांशी चर्चा करून जिल्ह्यातील सीईटी सेंटर हे तालुकास्तरावर सुरू करण्याबाबत सांगितले होते. त्यावर त्यांनीहीबºयाच ठिकाणी हे सेंटर तालुकास्तरावर घेण्याची कार्यवाही केली होती, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात लॉकडाऊनची आवश्यकता नाहीजिल्ह्यात प्रारंभी कोरोनाची स्थिती आटोक्यात होती. परंतु लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रूग्णांची संख्या वाढली. त्या पार्श्वभूमीवर नुकताच जिल्हा प्रशासनाबरोबर कोरोनाचा आढावा घेतला. त्यात पुन्हा लॉकडाऊन करावे का? याबाबत चर्चा झाली. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असून आवश्यक उपाययोजना केलेल्या आहेत. तालुकास्तरावरही कोरोना सेंटर सुरू असल्याने रूग्णांची व्यवस्था होत आहे, असे जिल्हाधिकाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या तरी लॉकडाऊनची गरज नाही, असे तनपुरे म्हणाले. परंतु कोरोना सेंटरमध्ये रूग्णांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. कोरोना चाचण्या वाढवण्याबाबत सूचना दिल्या असून काही दिवसांतच रोज ७०० ते ८०० चाचण्या होतील, असे तनपुरे यांनी सांगितले.

विद्यापीठांचा तो निर्णय चुकीचाचकाही कृषी विद्यापीठांनी गुणपत्रिकांवर ‘कोविड प्रमोटेड’असा शिक्का मारला, याबाबत विचारले असता, हा प्रकार चुकीचा आहे. विद्यापीठांना असे करायला नको होते. कृषिमंत्र्यांनी त्यावर कार्यवाही केली आहे. इतर विद्यापीठांकडून असे होणार नाही, असे तनपुरे यांनी सांगितले. 

लग्न समारंभातील गर्दीवर कारवाईची सूचनालग्न समारंभासाठी मर्यादित लोकांना परवानगी असली तरी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे लक्षात येत आहे. त्यातूनही कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. याबाबत पोलिसांनी लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु आनंदाच्या क्षणी अशी कारवाई होण्यापेक्षा गर्दीच होणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घेण्याची गरज असल्याचे तनपुरे म्हणाले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरेministerमंत्री