राहुरी : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचा-यांना सेवेत कायम करावे, या व विविध मागण्यांसाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात रविवारी (१४ जून) काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून हजारो कर्मचारी आरोग्य प्रशासनामध्ये झटत आहेत. रुग्णसेवा करीत असताना कंत्राटी कर्मचा-यांकडून अधिक प्रमाणात कामे करून घेतली जातात. परंतु याबद्दल मोबदला अत्यंत तुटपुंजा देण्यात येतो. रात्रंदिवस कंत्राटी कर्मचारी आरोग्य प्रशासनामध्ये कार्य करीत असतानाही त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकतेच १७ हजार जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद प्रशासनामध्ये अकरा हजार जागा रिक्त आहेत. या जागांवर कंत्राटी कर्मचाºयांना नियुक्ती द्यावी, अशी मागणी कर्मचाºयांनी केली आहे.
१४ जूनपर्यंत तालुकास्तरावर आंदोलन करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य समन्वयक किरण शिंदे यांनी दिली आहे. या काळात सरकारने कर्मचा-यांवर कुठलीही कारवाई केल्यास आंदोलन चिघळले जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.