अहमदनगर : सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवरील पूल ते वडगाव गुप्ता रोडचे काम महिन्यापूर्वी सुरू झाले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने ठेकेदाराने आयताकृती खड्डे खोदले होते. हे काम महिनाभरापासून ठप्प आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे महापालिकेच्या शाखा अभियंत्यांचेही दुर्लक्ष झाले आहे.
सावेडी उपनगरातील कॉटेज कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. पाईपलाईन रोडवरून वडगाव गुप्ताकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या भागातील नगरसेवक संपत बारस्कर यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम ठेकेदाराने सुरू केले. पाईपलाईन रोड ते आठरे पाटील शाळेच्या प्रवेशव्दारापर्यंतच्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूने मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. हे खड्डे अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत. मध्यंतरी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचले होते. पाऊस थांबला आहे. मात्र, अद्याप ठेकेदाराने काम सुरू केले नसून, या मार्गावर अर्धवट रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.
......
ठेेकेदाराला महापालिका बजावणार नोटीस
पाईपलाईन रोडवरील पूल ते वडगाव गुप्ता रस्त्याच्या दुरुस्तीचे काम घेतलेल्या ठेकेदाराने काम थांबविलेले आहे. अर्धवट कामामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, ठेकेदार त्यांच्या सोयीनुसार काम करणार असतील. ते याेग्य नाही. संबंधित ठेकेदाराला रितसर नोटीस बजावण्यात येईल.
- सुरेश इथापे, शहर अभियंता, महापालिका
....
सूचना: फोटो १५ वडगावगुप्ता नावाने आहे.