दहिगाव बोलका : महाराष्ट्र बँकेतील कर्मचा-यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून शुक्रवारी (दि.१० जुलै) कामकाज सुरू ठेवले आहे.
युनायटेड फोरम आँफ महाबँक युनियन्सच्या वतीने शुक्रवारी (१० जुलै) हा दिवस 'डिमांड डे' म्हणून जाहीर केला आहे. या दिवसाच्या निमित्ताने बँक आॅफ महाराष्ट्रच्या कर्मचा-यांनी विविध १३ मागण्या केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर शाखा सॅनिटाईज करण्यासाठी मनुष्यबळ पुरवावे. प्रत्येक शाखेत गार्ड नेमून ग्राहकांच्या सोशल डिस्टन्सवर लक्ष ठेवले जावे.
क्वारंटाईन कर्मचा-यांना संस्थात्मक वर्गीकरण सुविधा पुरवावी. ५५ वर्षे व त्यावरील कर्मचाºयांना वर्क फ्रॉम होम सुविधा पुरवावी. प्रत्येक शाखेत रोटेशन पध्दत वापरून ५० टक्के कर्मचा-यांचीच उपस्थिती अनिवार्य ठरवावी. कर्मचा-यांना ५० लाख रूपयांचे विमा संरक्षण मिळावे. राजकारणी, लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी यांच्या दडपणापासून संरक्षण मिळावे आदी मागण्यांचा समावेश आहे.