पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथील आशा सेविका शारदा गोरक्षनाथ काळे यांना कोरोनाच्या महामारी काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जागतिक संविधान व संसदीय संघ महाराष्ट्र (श्रीरामपूर चॅप्टर)
यांच्यातर्फे वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वॉरियर्स पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नुकताच त्यांचा गौरव करण्यात आला. शारदा काळे यांनी पुनतगाव या छोट्याशा गावात आशा सेविका म्हणून काम पाहताना कोरोना महामारीच्या काळात गावातील नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत उत्कृष्ट सेवा दिली. या सेवा कार्याची दखल घेत देशात नावाजलेल्या संस्थेने पुरस्कार देऊन सन्मानित केले.
यावेळी मुख्याध्यापक सुरेश मतकर, शिक्षिका अश्विनी परदेशी, उपसरपंच दिलीप वाघमारे, ॲड. सोमनाथ वाकचौरे, बाबासाहेब वाघमारे, सुदर्शन वाकचौरे, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव वाकचौरे, डॉ. शामराव काळे, सतीश वाकचौरे, पवन वाघमारे, दत्तात्रय गाडेकर, मच्छिंद्र वाकचौरे, फकिरा वरुडे, विठाबाई पवार, कामाबाई काळे, संजय वाघमारे, ज्ञानेश्वर वाघमारे आदी उपस्थित होते.
फोटो : ३१ पाचेगाव
पुनतगाव येथील आशा सेविका शारदा काळे यांचा ग्रामस्थांनी गौरव केला.