सन्मतीवाणीजिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उध्दार करी, असे आईबद्दल बोलले जाते. आईने केलेले संस्कार भावी आयुष्यात उपयोगी पडतात. सांभाळते ती आई, घडविते ती जिजाई. मानवाचा महामानव करण्याची ताकद मातेच्या संस्कारातच आहे. महावीर कथेत मातृत्वाचे वर्णन आहे. महावीरांनी मातृत्व, वात्सल्याच्या भावनेतून सर्वांवर प्रेम केले. वात्सल्याने जीवनात परिवर्तन होते. गर्भवतीने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गर्भवतीने आहारावर नियंत्रण ठेवावे. गर्भावस्थेत धार्मिक ग्रंथांचे वाचन व धार्मिक विचारांचे श्रवण केले तर त्याचा परिणाम गर्भावर होतो. छत्रपती शिवाजी राजांचा पराक्रम संपूर्ण भारताला माहित आहे. विदेशातही राजांच्या युध्द कौशल्याचे कौतुक केले जाते.मातेचा आशीर्वाद घ्यावा, त्याने जीवनाचे कल्याण होईल. जे काम परमात्मा करु शकणार नाही ते काम आईच करु शकते. घरातील मुलांवर मातेचे संस्कार असतील तर घरातच स्वर्ग निर्माण होऊ शकतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विशेष व्रत करतात. अनंत सौख्याच्या प्राप्तीकरीता व्रत केले जाते. धर्मस्थानात जे अनुष्ठान केले जाते त्यामुळे फल प्राप्ती होते. मातेचे महत्व सर्वजण सांगतात. ज्या घरात आई वडिलांचा आदर केला जातो ते घर सदा सुखी होते. मातेचे संस्कार सर्वश्रेष्ठ आहेत. मातेच्या संस्काराने मुले संस्कारक्षम नागरिक बनू शकतात. मातेला वंदन करु या. - पू. श्री. सन्मती महाराज
मातेला वंदन करु या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:22 PM