- मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : सत्तेत असलेल्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गेली पाच वर्षे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी लावून धरली आहे. पण त्यांचाच पक्ष सत्तेत असलेल्या भाजप-सेना सरकारने मात्र संपूर्ण कर्जमाफीला शेवटच्या अर्थसंकल्पनांतरही ठेंगच दाखविला आहे.शिवसेनेचे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख आमदार नरेंद्र दराडे, काँग्रेसचे डॉ. सुधीरतांबे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीबाबत शुक्रवारी विधान परिषदेत तारांकित प्रश्न विचारला होता. त्यालामदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुखयांनी लेखी उत्तर दिले. २८ जून २०१७ च्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे. ३१ मे २०१९ अखेरपर्यंत ५० लाख २७ हजार खातेदारांना २४ हजार १०२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. ४३ लाख ७६ हजार लाभार्थ्यांना १८ हजार ४५७ कोटी ४० लाख रुपयांचा लाभ दिला आहे, असे सांगतानाच संपूर्ण कर्जमाफीबाबत विचार नसल्याचे मंत्र्यांनी उत्तरात स्पष्ट केले आहे.४ हजार ४६१ कोटींचे दुष्काळ अनुदानराज्यातील दुष्काळग्रस्त १५१ तालुक्यांसाठी ४ हजार ९०९ कोटी ५१ लाखांचा निधी वितरित केला आहे. त्यापैकी ६६ लाख ८८ हजार शेतकºयांच्या बँक खात्यात ४ हजार ४६१ कोटी २० लाखांचा निधी वर्ग केल्याचे मंत्री देशमुख यांनी विधान सभेतील एक उत्तरात सांगितलकर्जमाफीच्या आकडेवारीचा घोळदरम्यान कर्जमाफी योजनेच्या आकडेवारीचा दोन वषार्नंतरही घोळत घोळ सुरू आहे. त्यामुळे किती शेतकºयांनी कर्जमाफीचा अर्ज केले, किती जणांना कर्जमाफी मिळाली, किती जण राहिले याची अधिकृत आकेडवारीच सरकारी यंत्रणांकडे नाही.
संपूर्ण कर्जमाफीला ठेंगा, सरकारचा विचार नसल्याचे लेखी उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 5:40 AM