शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

बेलापूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-बीड-परळी रेल्वे मार्गाचे चुकीचे सर्वेक्षण; सलग सहाव्या दिवशी कुकाणा ग्रामस्थांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 2:28 PM

बेलापूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-बीड-परळी या रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सर्वेक्षणच्या विरोधात कुकाणा येथील नागरिकांनी १ डिसेंबरपासून कुकाणा येथील ग्रामस्थांचे उपोषण सुरु आहे. सलग सहाव्या दिवशी हे उपोषण सुरु असून, बुधवारी गाव बंद ठेवून चक्री उपोषण सुरु करण्यात आले.

कुकाणा : बेलापूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-बीड-परळी या रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सर्वेक्षणच्या विरोधात कुकाणा येथील नागरिकांनी १ डिसेंबरपासून कुकाणा येथील ग्रामस्थांचे उपोषण सुरु आहे. सलग सहाव्या दिवशी हे उपोषण सुरु असून, बुधवारी गाव बंद ठेवून चक्री उपोषण सुरु करण्यात आले.कुकाणा ग्रामपंचायत कार्यालयाच्या व्यासपीठावर हे उपोषण सुरु आहे. ब्रिटिशांनी सन १९२२ मध्ये या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली होती. या मार्गासाठी भूमी अधिग्रहण करण्यात आले होते तसेच माती भरावाचे कामही पूर्ण झाले होते. संपादित जमिनींच्या उताºयावर रेल्वे प्रशासनाचे नाव लावण्यात आले आहे. या लोह मार्गाचा सर्वे बेलापूर-नेवासा- शेवगाव - पाथर्डी - राजुरी - रायमोह - बीड असा चुकीचा करून तो न परवडणारा असल्याचा सर्वे रिपोर्ट सादर झाल्याने मूळ रेल्वे मार्ग मागे पडला आहे. या रेल्वे मार्गाच्या पूर्णत्वासाठी बेलापूर- परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्था गेली ८-१० वषार्पासून पाठपुरावा करीत आहे. परंतु या मार्गाचे काम सुरु होत नसल्याने कुकाणा येथील नागरिकांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात रितेश भंडारी, सुरेश नरवणे, कारभारी गरड, प्रकाश देशमुख, निसार सय्यद, महेश पुंड हे सहा दिवसापासून सहभागी झाले आहेत. या उपोषणादरम्यान खासदार सदाशिव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार बाळासाहेब मुरकुटे आदिंनी भेटी देऊन राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले़ परंतु उपोषणकर्त्यांनी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याला कुकाणा व परिसरातील गावांनी जाहीर पाठिंबा दिला. आजपासून चक्री उपोषण सुरु करण्यात आले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा