एन्ट्रो------------------------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : २०२० वर्ष उजडले ते कोरोनाचा धसका घेऊनच. १२ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण जिल्ह्यात आढळला. एकापाठोपाठ एक करीत ६८ हजारांपेक्षा जास्त जणांना कोरोनाने ग्रासले. जिल्ह्याची अवघी यंत्रणा कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी कामाला लागली होती. सॉनिटायझर, मास्क आणि सामाजिक अंतराच्या नव्या नियमांना सोबत घेवून जगण्यासाठी प्रत्येकाला धडपड करावी लागली. एक- एक करता करता १ हजार ३९ जणांचा कोरोनाने जीव घेतला. काहींचे जीवलग गेले, काहींच्या नोकऱ्या गेल्या. उद्योग-धंदे बंद पडले, काही बुडाले. लॉकडाऊनमध्येच वर्ष सरले. नुकसान करणाऱ्या कोरोनाने प्रत्येकाला जीवनाचा अर्थ गवसला.
----------------
महसूल प्रशासन
१२ मार्च- कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला
१९ ऑक्टो-राहुल द्विवेदी यांची पुण्याला बदली, डॉ. राजेंद्र भोसले नवे जिल्हाधिकारी
ऑक्टोबर- अतिवृष्टीने कोट्यवधी रुपयांच्या पिकांचे नुकसान
---------