महाभारतात सांगितले आहे की, ग्रहण काळात कोट्यवधी गायींचे दान केले. गंगा, प्रयागांच्या स्थळी यज्ञ करताना सोन्याचे दान केल्याने जो पुण्य संचय होत असतो. अशा पुण्याचा साठा या परिक्रमेतून मिळत असतो. अशा पुण्याचा संचय करण्याचा योग शिर्डी परिक्रमेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे भाविकांनी या परिक्रमेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सरला बेट मठाधिपती महंत रामगिरी महाराज शिर्डी येथे परिक्रमा बैठकीदरम्यान केले.
याप्रसंगी व्यासपीठावर ग्रीन. एन. क्लिन शिर्डीचे अध्यक्ष अजित पारख, गोपीनाथ गोंदकर, रमेश गोंदकर, शिवसेनेचे कमलाकर कोते, उपनगराध्यक्ष सचिन कोते, ॲड. अनिल शेजवळ, प्रा.रघुनाथ गोंदकर, संजय शिर्डीकर, रविकिरण डाके, विशाल तिडके, सचिन चौगुले, सचिन तांबे, राजू मांडवा, विनोद गोंदकर, रजनी गोंदकर उपस्थित होते.
रामगिरी महाराज पुढे म्हणाले, संत गंगागीर महाराजांसारखे योगी आणि साई बाबांसारखे महात्मा अशा या दोन महापुरुषांचा महायोग म्हणजे गंगागीर महाराजांचा १७१ वा सप्ताह यशस्वीरीत्या पार पडला. त्यानंतर शिर्डी परिक्रमेचे अयोजन करण्यात आले. परिक्रमा करण्यामागे शास्त्रीय कारण आहे. जी व्यक्ती ज्या स्थानावर वास्तव्यास असते. त्या स्थानावर एक उर्जा असते. ती उर्जा एका विशिष्ट अंतरापर्यंत असते.
जशी पृथ्वीची एका सीमेपर्यंत गुरुत्वाकर्षणाची शक्ती असते. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या भोवती एक विचाराच वलय असते. असा सिध्दांत जगदीश बोस यांनी मांडला होता. त्यानुसार दुर्जनाच्या संगतीत आपण गेला तर त्यांच्यातील सूक्ष्म कण आणि आपले सूक्ष्म कण एकत्र येतात. त्यातून त्या दुर्जनांचे विचार सज्जनात जात असतो. जेव्हा आपण महापुरुषांच्या संयोगात येतो. त्यांच्यातून आपणास एक उर्जा मिळतो. त्या उर्जेतून कुविचार नष्ट होते. त्यामुळे परिक्रमा केल्यास पुण्य मिळत असते. जो व्यक्ती परिक्रमा करतात. त्यांच्या पुण्याची गणना होणार नाही, असेही ते म्हणाले.