योगाची निर्मिती भारतात झाली आहे. योगामुळे शरीर व मन निरोगी राहते. विद्यार्थी जीवनात योग व प्राणायाम यांचा सराव सुरू केल्यास निरोगी आणि आनंदी जीवन जगता येईल, असेही त्या म्हणाल्या.
आंतरराष्ट्रीय योगदिनी संजीवनी अकॅडमी व संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये व्हर्चुअल पध्दतीने संगीतमय योगाचे आयोजन करण्यात आले होते. संजीवनी अकॅडमीतून कोल्हे यांनी ऑनलाइन पध्दतीने दोन्ही स्कूलच्या विध्यार्थ्यांना संदेश दिला. संजीवनी अकॅडमीत काही निवडक विद्यार्थ्यांनी प्रसिध्द योगशिक्षक डाॅ. अभिजित शहा यांनी ऑनलाइन पध्दतीने योगाचे सादरीकरण केले. डाॅ. शहा यांना शिर्डी येथील प्रसिध्द व्यावसायिक विनोद ज्ञानदेव गोंदकर व त्यांच्या पत्नी रेश्मा गोंदकर यांनी साथ दिली.
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय योगा सुवर्णपदक विजेते प्रसाद घयवट यांनीही ऑनलाइन पध्दतीने विद्यार्थी व पालकांना योगाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी संजीवनी अकॅडमीमध्ये प्राचार्या सुंदरी सुब्रमण्यम तर संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्राचार्या रितू सरवाई व अकॅडमिक हेड माया फर्नांडिस उपस्थित होत्या.