अहमदनगर : वाढत्या वयात प्रत्येक मुलांच्या काहीनाकाही समस्या असतात़ मुलगा हट्टी असेल तर माता-पित्यांकडून इतरांसमोर त्याचा उपहास केला जातो़ यातून चुकीचे समज विद्यार्थ्यांच्या मनात घर करून राहतात़ यासाठी माता-पित्यांनी हट्टी मुलांचा उपहास न करता त्यांना समजून घ्यावे़ असे आवाहन लर्निंग हबच्या प्रा़ योगिता खेडकर यांनी केले़‘लोकमत’च्यावतीने आयोजित शैक्षणिक प्रदर्शनात सोमवारी खेडकर यांनी शिक्षण आणि विद्यार्थी मानसशास्त्र या विषयावर विद्यार्थी-पालकांशी संवाद साधला़ खेडकर म्हणाल्या काही मुले अभ्यासाबाबत स्वयंप्रेरित असतात तर काहींना दुसऱ्यांनी समजून सांगावे लागते़ मुलांना घडवित असताना त्यांचे दैनंदिन जीवन आणि अभ्यास आणि करिअर यांचा योग्य समतोल राखने गरजेचे आहे़ समजदार मुलांनी आपल्यातल्या क्षमता ओळखणे गरजेचे आहे़ बहुतांशी मुलांचे अभ्यासात मन रमत नाही़ ते मोबाईल आणि टिव्हीच्या आहारी गेलेले असतात़ एकटेपणा, मोबाईल, टिव्हीची सहज उपलब्धता आणि मित्रांची संगत यातून मुलांबाबत अशा समस्या निर्माण होतात़ जोपर्यंत मुले परिपक्व होत नाहीत तोपर्यंत माता-पित्यांनी त्यांच्याकडे विशेष लक्ष्य देणे गरजेचे आहे़ घरात मुलांशी सुसंवाद वाढवावा, त्यांना वेळ द्यावा, वास्तव आणि अभासी जग यातील फरक त्यांना समजून सांगावे असे खेडकर म्हणाल्या़
हट्टी मुलांचा उपहास नको :योगिता खेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 7:16 PM