शरद दत्तात्रय वाघ (रा. पिंपळगाव उज्जैनी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मयताचे चुलते बाळासाहेब नामदेव वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मल्हारी उर्फ रघुनाथ बन्सी आल्हाट, सुभाष बन्सी आल्हाट, बन्सी भिवा आल्हाट, ऋषीकेश रघुनाथ आल्हाट व मारिया बन्सी आल्हाट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी बन्सी आल्हाट, सुभाष आल्हाट व मारिया आल्हाट यांना अटक केली आहे.
सोमवारी रात्री पिंपळगाव उज्जैनी येथील तलावाशेजारी असलेल्या माळरानावर शरद वाघ व त्याचे मित्र एकत्र जमले होते. यावेळी धिंगाना घातल्याच्या कारणातून दोन गटात वाद झाला. आरोपींनी शरद वाघ याच्या पोटात धारधार शस्त्र मारल्याने त्याचा मृत्यू झाला. यावेळी आरोपींनी शरद याचे मित्र महेश भानुुदास काकडे, शंकर फक्कड वाघ, नवनाथ सोपान वाघ व निवृत्ती भगवान वाघ यांनाही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज आठरे हे पुढील तपास करत आहेत.