पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरातील लोहसर, शिराळ, खांडगाव, भोसे, कौडगाव, घाटसिरससह अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीने लढविल्या गेल्या. या प्रत्येक गावाच्या निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्यांनी आपले नशिब अजमाविले. यामध्ये काहींना यश आले तर काहींना अपयश आले. प्रत्येक गावात दोन पॅनलमध्ये झालेल्या लढतीत मोठे नेते, पुढारी तसेच पक्षांचा अप्रत्यक्षरित्या पाठिंबा होता. ग्रामपंचायतीची निवडणूक जाहिर होताच गावातील सर्व पक्षांचे, संघटनांचे तरुण एकत्र आले. इतर गावातील विकास पहाता आपल्या गावातील खुंटलेला विकास करायचा या एकाच उद्देशाने सर्व तरूणांनी भैरवनाथ युवा परिवर्तन पॅनल तयार केला. मातब्बरांच्या श्री दाक्षिणमुखी हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा मोठा पराभव करून खांडगाव ग्रामपंचायतीच्या ६ जागा जिंकून ग्रामपंचायतीची सत्ता मिळविली. या निवडणुकीत ज्योती पवार, शोभा गायकवाड, दीपाली जगदाळे, वर्षा चव्हाण, शिवनारायण ससे, अशोक गायकवाड हे विजयी झाले.
...
तरुणांची एकजूट
शेजारच्या गावात मोठा विकास होत असताना आपल्या गावाचा मात्र विकास होत नसल्याची खंत गावातील तरुणांमध्ये होती. गावाचा विकास करण्याच्या उद्देशाने आम्ही तरुण एकत्र आले. ग्रामस्थांनी तरुणांवर विश्वास टाकून ग्रामपंचायतीची सत्ता तरूणांच्या ताब्यात दिली असे निखील पवार यांनी सांगितले.
...
१९खांडगाव ग्रामपंचायत
..
ओळी-पाथर्डी तालुक्यातील खांडगाव येथील भैरवनाथ युवा परिवर्तन पॅनलच्या तरुणांनी विजयानंतर जल्लोष केला.