अहमदनगर : बालिकाश्रम रोडवरच्या मागील व सीना नदीच्या बाजूस असलेल्या शेतीमध्ये बोरुडे मळा येथील तरुणांना एक काळवीट जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांनी पशुवैद्यकीय तज्ज्ञ, वनविभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने जखमी काळविटावर उपचार केले. पशु चिकित्सालयात पूर्ण उपचार झाल्यानंतर काळवीटाला निसर्गात मुक्त करण्यात येणार आहे.बालिकाश्रम रस्त्यावरील बोरुडे मळा येथील सीना नदीच्या काठावरील शेतामध्ये गुरुवारी रात्री साडेआकराच्या सुमारास एक काळवीट रात्री जखमी अवस्थेत पडून असल्याचे काही युवकांच्या लक्षात आले. या बाबत माहिती मिळताच माजी उपमहापौर अनिल बोरुडे, संदिप बोरूडे,अजित बोरूडे,विजय बनकर, सचिन लडकत,गणेश ऊदावंत,भाऊसाहेब पवार,शरद बोरूडे,भुषण बोरूडे, दिनेश बोरुडे हे तातडीने रात्रीच शेतामध्ये गेले. त्यांना ते काळवीट जखमी अवस्थेत आढळून आले. तरुणांनी या काळविटाची फासातून सुटका केली. तरुणांनी तातडीने निसगर्मित्र व व्याघ्र संरक्षण समितीचे सदस्य मंदार साबळे यांना कळवले. उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव पोकळे,वनपाल वनरक्षक सचिन शहाणे यांनी कळवीटावर जिल्हा पशु चिकित्सलयात उपचार करण्यात आले.या काळविटाच्या पायाला जखम झाली असून त्यास कुत्र्यांनीही चावा घेतला आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर काळविटाला निसर्गात मुक्त करण्यात येणार असल्याचे शहाणे यांनी सांगितले.
बालिकाश्रमरोडवरील शेतातील जखमी काळविटाचे युवकांनी वाचवले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 11:17 AM