अहमदनगर : शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत यंदाच्या पावसाळ्यात जिल्हा परिषदेने ४१ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे़ या वृक्षलागवड मोहिमेत जिल्ह्यातील १ हजार ३१२ ग्रामपंचायती सहभागी होणार आहेत़यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत वृक्षलागवडीची तयारी जोरात सुरु आहे़ या वृक्षलागवडीसाठी १५ लाख ८८ हजार ६४८ खड्डे खोदण्यात आले आहेत़नगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या हद्दीत ही वृक्षलावगड करण्यात येणार आहे़ अकोले तालुक्यात सर्वाधिक ४ लाख ६७ हजार २०० वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे़ संगमनेर तालुक्यात सर्वाधिक २ लाख ८५ हजार ८०६ खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली़
जिल्हा परिषद लावणार जिल्हाभरात ४१ लाख झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 1:01 PM