अहमदनगर : मार्केट यार्डमधील बालाजी ट्रॅव्हल्सच्या आॅफिसमध्ये २७ लाख रुपयांची खंडणी मागणारा आरोपी कैलास बापूराव शिंदे याला १ लाख रुपये स्वीकारताना पंचासमक्ष जेरबंद करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.याबाबत कल्पेश अमरसिंग परदेशी ( रा.भराडगल्ली, चितळेरोड, अहमदनगर) यांनी फिर्याद दाखल केली. कल्पेश परदेशी यांचे हॉटेल अनाधिकृत जागेत बांधले असल्याची तक्रार आरोपी शिंदे याने जिल्हादंडाधिकारी यांचे केली आहे. हा अर्ज मागे घेण्यासाठी शिंदे याने सुुरुवातीला तब्बल ५० लाख रुपयांची खंडणी मागीतली होती. त्यानंतर तडजोड करत ही रक्कम २७ लाखापर्यत आली. तडजोडीअंती ठरल्याप्रमाणे २९ आॅगस्ट रोजी १ लाख रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर बालाजी ट्रॅव्हल्सच्या आॅफीसमध्ये शिंदे यास १ लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
२७ लाखांची खंडणी मागणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 3:35 PM