शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

झेडपीचे सॅनेटरी नॅपकीन बाजारभावापेक्षा महाग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 11:35 AM

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून व समाजकल्याण विभागाच्या विशेष घटक योजनेतून सुमारे सव्वा दोन कोटी रुपये खर्चून तरुणी व महिलांसाठी सॅनेटरी नॅपकीन खरेदी करण्यात येणार आहेत़ मात्र, बाजारात मिळणाºया चांगल्या प्रतीच्या नॅपकिनपेक्षा ते चांगलेच महाग आहेत. 

संडे विशेष - साहेबराव नरसाळे ।  

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून व समाजकल्याण विभागाच्या विशेष घटक योजनेतून सुमारे सव्वा दोन कोटी रुपये खर्चून तरुणी व महिलांसाठी सॅनेटरी नॅपकीन खरेदी करण्यात येणार आहेत़ मात्र, बाजारात मिळणाºया चांगल्या प्रतीच्या नॅपकिनपेक्षा ते चांगलेच महाग आहेत.  महिला व बालविकास विभागाच्यावतीने यासाठी निविदा काढण्यात आली होती. आदिवासी तसेच अनुसूचित महिला, किशोरवयीन तरुणींना २ कोटी २४ लाख रुपये खर्चून २९ लाख ९३ हजार ३३३ नॅपकीन वाटप केले जाणार आहेत. मासिक पाळीत उपयुक्त असणा-या या एका नॅपकिनसाठी ७ रुपये ५० पैसे असा दर पुरवठादार संस्थेला दिला जाणार आहे. हा दर सर्वात कमी असल्याचा जि.प. प्रशासनाचा दावा आहे. हा पुरवठा करण्याचा ठेका जळगावच्या अ‍ॅनालिटीकल टेस्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च लॅबोरेटरी संस्थेला देण्यात आला आहे़ ‘लोकमत’ने बाजारात विविध कंपन्यांच्या नॅपकीनच्या किमतीची तसेच दर्जाची चौकशी केली असता ४ रुपये ५० पैशांपासून नॅपकीन उपलब्ध असल्याचे दिसते. बाजारात एका पाकिटात ७ नॅपकीन असतात़  जि.प. चा पुरवठादार एका पाकिटात ६ नॅपकीन देणार आहे. जि.प. ने निवडलेला नॅपकीन २९० मिलीमीटर लांब व ७५ मिलीमीटर रुंद आहे़ एका नामांकित कंपनीचा २८४ मिलीमीटर लांब व ७५ मिलीमीटर रुंद तसेच सेल्युलोज पल्प व कॉटनपासून बनविलेला नॅपकीन ४ रुपये ५० पैशाला मिळतो. म्हणजे ३२ रुपयांत सात नॅपकीनचे पॅक मिळते. जि.प. मात्र ४५ रुपयांत सहा नॅपकीन खरेदी करत आहे. आठ संस्थांनी भरली होती निविदासॅनेटरी नॅपकीन पुरविण्यासाठी औरंगाबाद येथील अग्नीवेश हेल्थकेअर, नागपूर येथील इंडिमेट प्रेस मेटल प्रा़लि़, जळगाव येथील गौरव एन्टरप्रायजेस, जळगाव येथील श्री अ‍ॅनालिटीकल टेस्टींग अ‍ॅण्ड रिसर्च लॅबोरेटरी, जळगाव येथील मॅट्रिक्स हेल्थ केअर प्रॉड्क्टस्, चेन्नई येथील ईव्हीए ट्रेडर्स, जळगाव येथील सुवर्णा हायटेक इन्स्ट्रयूमेंट, गाजियाबाद (उत्तरप्रदेश) येथील फेडरल मॅन्युफॅक्चरिंग अशा ८ संस्थांनी सॅनेटरी नॅपकीन पुरविण्यासाठी निविदा भरली होती़ त्यातील नागपूर, चेनई, गाजियाबाद व जळगावची १ संस्था अशा एकूण ४ संस्था  अपात्र ठरल्या़ तर जळगावच्या ३ व औरंगाबादची १ संस्था निविदा प्रक्रियेसाठी पात्र ठरल्या़

निविदा भरलेल्या कंपन्यांचा दर व बाजारातील दरांची तुलना करुनच या कंपनीची निवड करण्यात आली आहे. अ‍ॅनालिटीकल टेस्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च लॅबोरेटरी ही संस्था केवळ पुरवठादार आहे. ते कोठून खरेदी करतात याची प्रशासनाला कल्पना नाही, असे महिला बालकल्याण विभागाचे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी  संजय कदम यांनी सांगितले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAhmednagarअहमदनगर