शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
2
प्रियंका गांधी लढवणार निवडणूक; काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा
3
भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई; प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा
4
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
5
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
6
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
7
अंबानी कुटुंबाकडून रतन टाटांचे स्मरण; रिलायन्सच्या वार्षिक कार्यक्रमात टाटांना वाहिली श्रद्धांजली
8
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
9
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
10
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
11
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
12
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
13
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
14
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
15
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
16
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
17
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
18
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
19
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
20
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया

साईनगरीतून १२५१ मजूर रेल्वेने उत्तरप्रदेशला रवाना; कर्मचा-यांनी टाळ्या वाजवून दिला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 4:58 PM

शिर्डी परिसरातील वीटभट्टीवर काम करणा-या १२५१ मजुरांना बुधवारी (दि.६ मे) साईनगर रेल्वेस्थानकावरून रेल्वेने उत्तरप्रदेशला स्वगृही रवाना करण्यात आले. घरी जाण्याचा आनंद या मजुरांच्या चेहºयावर स्पष्ट दिसत होता.

शिर्डी : शिर्डी परिसरातील वीटभट्टीवर काम करणा-या १२५१ मजुरांना बुधवारी (दि.६ मे) साईनगर रेल्वेस्थानकावरूनरेल्वेने उत्तरप्रदेशला स्वगृही रवाना करण्यात आले. घरी जाण्याचा आनंद या मजुरांच्या चेहºयावर स्पष्ट दिसत होता. लॉकडाऊनमुळे येथे अडकलेल्या या साडेबाराशे मजुरांना घेवून बुधवारी दुपारी तीन वाजता ही रेल्वे लखीमपूर (उत्तरप्रदेश) येथे रवाना करण्यात आली. प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, नायब तहसीलदार सचिन म्हस्के, शिक्षण अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे, पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, मिथुन घुगे, रेल्वेचे स्थानकप्रमुख बी़एस़ प्रसाद, पोलीस निरीक्षक रामजी मीना, अनुप देशमुख यांच्यासह शंभरावर कर्मचा-यांनी टाळ्या वाजवत व हात हलवत या सर्वाना निरोप दिला.रेल्वे निघण्यापूर्वी या मजुरांना प्रत्येक बोगीत जावून संस्थानचे सीईओ अरूण डोंगरे यांच्या आदेशानुसार प्रसादालय प्रमुख विष्णू थोरात, भाऊसाहेब थोरात आदींसह प्रसादालय कर्मचा-यांनी अन्नाची पाकिटे दिली. गुरूवारी सायंंकाळी साडेसहा वाजता ही रेल्वे लखीमपुरला पोहचेल.   या मजुरांमध्ये ७५२ प्रौढ, ३१४ अर्धे तिकीट काढणारे व १८५ मुले चार वर्षाखालील आहेत. हे सर्वजण येथून जवळच असलेल्या पिंपळवाडी व परिसरातील वीटभट्ट्यांवर काम करणारे आहेत. गेले दोन दिवसांपासून या मजुरांना पाठविण्यासाठी प्रशासनाने रांत्रदिवस काम केले आहे. ग्रामिण रूग्णालयाचे डॉ़संजय गायकवाड, डॉ़ गागरे आदींनी मंगळवारी या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना प्रमाणपत्रे दिली. साठ शिक्षकांनी फिरून या मजुरांचा सर्व्हे केला. नियंत्रण कक्षाची स्थापना मजुरांना स्वगृही पाठवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हाधिकारी अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली नियंत्रण कक्ष काढण्यात आला आहे. यात संदीप नचित, वैशाली आव्हाड, चंद्रशेखर शितोळे आदी कार्यरत आहेत. हे वरिष्ठ अधिकारी रेल्वे निघेपर्यत येथील प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार कुंदन हिरे यांच्या संपर्कात होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLabourकामगारrailwayरेल्वेshirdiशिर्डी