शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
2
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
3
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
4
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
5
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
6
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
7
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
8
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
9
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
10
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
11
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
12
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
13
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
14
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
15
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
16
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
17
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
18
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
19
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

संपात २२ हजार ग्रामसेवक सहभागी होणार : एकनाथ ढाकणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 11:05 AM

राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात २२ हजार ग्रामविकास अधिका-यांसह ग्रामसेवक सहभागी होणार आहेत

अहमदनगर : राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात २२ हजार ग्रामविकास अधिका-यांसह ग्रामसेवक सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.सहाव्या वेतनातील त्रुटीत सुधारणा, सातवा वेतन आयोग लागू करणे, अंशदायी जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचा-यांच्या संघटनांनी येत्या ७ ते ९ या काळात संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपात राज्यातील ग्रामसेवक सहभागी होणार आहेत. ग्रामसेवक संघटनेचे राज्य अध्यक्ष ढाकणे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे. सन २०१७ मध्ये जानेवारी व जुलै या महिन्यांत झालेल्या संपातील मागण्यांवर तोडगा निघालेला नाही. सरकारी कर्मचा-यांनी डिसेंबर २०१७ मध्ये मंत्रालयावर महामोर्चा काढला. याशिवाय यावर्षी १२ जून रोजी निदर्शने केली. परंतु शासनाकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे संपात सहभागी होण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.या आहेत मागण्याजुनी पेन्शन योजना, सातवा वेतन आयोग लागू करावा, खासगीकरण व कंत्राटी धोरण रद्द करावे, कंत्राटी कर्मचा-यांना किमान वेतन २६ हजार रुपये द्यावे, महागाईभत्त्याची थकबाकी त्वरित अदा करावी, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, पाच दिवसांचा आठवडा करावा, ग्रामसेवकपदासाठी शैक्षणिक अर्हता पदवीधर करावी, आदी मागण्या संपात मांडण्यात येणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर