शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
3
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
4
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
5
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
6
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
7
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
8
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
9
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
10
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
11
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
12
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
13
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
14
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
15
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
16
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
17
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
18
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
19
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
20
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य

अर्बन बँकेचा ठेवी वाढविण्यासाठी प्रयत्न -सुभाषचंद्र मिश्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 5:38 PM

नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या आठशे कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी आतापर्यंत केवळ २४ कोटी रुपयांची थकबाकी वसुली झाली आहे. बँकेवर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर इतर बँका व पतसंस्थांनी त्यांच्या अर्बन बँकेतील २५० कोटी रुपयांच्या ठेवी काढून घेतल्या आहेत.

अहमदनगर : नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या आठशे कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी आतापर्यंत केवळ २४ कोटी रुपयांची थकबाकी वसुली झाली आहे. बँकेवर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर इतर बँका व पतसंस्थांनी त्यांच्या अर्बन बँकेतील २५० कोटी रुपयांच्या ठेवी काढून घेतल्या असल्या तरी ८३ कोटींच्या नव्या ठेवी बँकेत जमा झाल्या आहेत.बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनीच शुक्रवारी बँकेत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, बँकेचा २०० ते २५० कोटी रुपयांचा एनपीए होता. बँकेने १०० कोटी रुपये थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. त्यामध्ये २४ कोटी रुपयांची थकबाकी वसुली झाली आहे. राहिलेल्या वसुलीसाठी विशिष्ट वेळ नसली तरी लवकरात लवकर उद्दिष्टपूर्ती करू, असे मिश्रा म्हणाले. आतापर्यंत २० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे ६० कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यांच्याकडील वसुलीची प्रक्रिया सुरू आहे. थकबाकी वसुलीसाठी पाच पथके तैनात करण्यात आली आहेत.बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळावर जबाबदारी निश्चित केल्यामुळेच रिझर्व्ह बँकेने त्यांना पदावरून दूर केले. मात्र त्यांनी नेमके काय केले, त्यांच्यावरील पुढील कारवाईबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठविलेला नाही. बँकेत तात्पुरत्या स्वरुपात ज्या कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यांचा कालावधी संपताच त्यांना कामावरून कमी करण्यात येईल. कर्ज मंजुरीची प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे. प्रशासक नियुक्त झाल्यानंतर ठेवीदार आणि सभासदांचा बँकेवरील विश्वास वाढत असल्यामुळेच आतापर्यंत ८१ कोटीच्या नव्या ठेवी बँकेत जमा झाल्याचेही मिश्रा यांनी सांगितले.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रAhmednagarअहमदनगर