शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
6
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
7
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
8
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
9
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
11
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
12
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
13
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
14
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
15
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
16
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
17
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
18
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
19
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...

चार महिन्यांत जिल्ह्यात ४५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Published: April 24, 2016 11:04 PM

अहमदनगर : सततची नापिकी, कोलमडलेले आर्थिक नियोजन आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर, यामुळे गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यातील ४५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे़

अहमदनगर : सततची नापिकी, कोलमडलेले आर्थिक नियोजन आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर, यामुळे गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यातील ४५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे़ त्यापैकी २५ आत्महत्याग्रस्त शेतकरी सरकारी मदतीस पात्र ठरले तर ११ आत्महत्याग्रस्तांच्या फेरचौकशीचे आदेश प्रशासनाने दिले आहेत़ सर्वाधिक आत्महत्या गेल्या चार महिन्यांत झाल्याचे अहवालावरून समोर आले आहे़गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे़ सन २००३ पासून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे, ते अद्याप थांबलेले नाही़ मागील वर्षी ११७ शेतकऱ्यांनी मृत्युला जवळ केले़ चालू वर्षात कमी पाऊस पडला़ त्यामुळे खरीप व रब्बी हंगाम वाया गेला़ त्यावर केलेल्या गुंतवणुकीवर पाणी फिरले़ बळीराजा कर्जबाजारी झाला आहे़ त्यामुळे दररोजचा खर्च भागविणेही कठीण होऊन बसले़ जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार जानेवारी, फेबु्रवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये ४५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ त्यापैकी २५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे़ जिल्ह्यात कधी नव्हे ती भीषण स्थिती निर्माण झाली आहे़ खरीप व रब्बी हंगामातील पैसेवारीच्या अहवालावर नजर टाकल्यास संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या छायेखाली आल्याचे प्रकर्षाने जाणवते़ विशेष म्हणजे उत्तर नगर जिल्ह्यात यंदा बिकट स्थिती निर्माण झाली़ धरणांत पाणी असून, ते शेतीला मिळाले नाही़ मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेती उद्ध्वस्त झाली़ दक्षिण नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातूनही यंदा पाणी मिळाले नाही़ त्यामुळे लाभक्षेत्रातील फळबागा झळून खाक झाल्या़ त्यामुळे बळीराजावर आर्थिक संकट ओढावले़ यातून निर्माण झालेल्या नैराश्येतून आत्महत्यासारखा विखारी मार्ग शेतकऱ्यांनी अवलंबिला़ घरातील कर्ता माणून न राहिल्याने संसार उघड्यावर आले असून, प्रशासनाकडून याबाबत ठोस उपाययोजना हाती घेतल्या गेल्या नाहीत, हे विशेष़ (प्रतिनिधी)३६५ शेतकऱ्यांच्या आत्महत्यागेल्या २००३ ते एप्रिल २०१६ या काळात जिल्ह्यातील ३६५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे़ त्यापैकी ४५ शेतकऱ्यांनी गेल्या चार महिन्यांत आत्महत्या केल्या असून, त्यापैकी २५ शेतकऱ्यांनी कर्जापायी आत्महत्या केल्याचे प्रशासनाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे़ त्यांच्या नातेवाईकांना सरकारी मदतही वितरीत करण्यात आली आहे़