शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
4
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
5
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
6
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
7
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
8
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
9
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
10
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
11
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
12
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
13
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
14
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
15
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
16
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
17
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
18
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
19
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
20
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

आदिवासी विद्यार्थ्यांचे नगरमध्ये उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 1:08 PM

येथील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात असुविधांच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळपासून वसतिगृहासमोर उपोषण सुरू केले. याच विद्यार्थ्यांनी शनिवारी दिवसभर अन्नत्याग केला होता.

आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात असुविधांच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळपासून वसतिगृहासमोर उपोषण सुरू केले. याच विद्यार्थ्यांनी शनिवारी दिवसभर अन्नत्याग केला होता.माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्या नेतृत्त्वाखाली पाईपलाईन रोडवरील भिस्तबागा नाका येथील या वसतिगृहात विद्यार्थ्यांना कॉट, संगणक, लॅब, अभ्यासिका आदी सुविधा दिलेल्या नाहीत. अशुद्ध पाणी आणि निकृष्ट भोजन दिले जाते. याबाबत राजूर येथील आदिवासी प्रकल्प विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याची दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांनी उपोषण केले. जोपर्यंत चांगले भोजन मिळत नाही, तोपर्यंत अन्नत्याग करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे. प्रकल्प अधिकाºयांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत. अधिकारी न आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयालवर मोर्चा नेवून तिथेच उपोषण करणार आहेत. ‘आमच्या मागण्या पूर्ण करा... नाही तर खुर्च्या खाली करा’, ‘शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा विद्यार्थ्यांनी यावेळी दिल्या. आदिवासी प्रकल्प विभागाचे कार्यालय राजूर (ता.अकोले )येथे आहे. त्यामुळे या उपोषणाची दखल घेण्यासाठी अधिकारी येणार की हे आंदोलन आणखी चिघळणार याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर