शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

अहमदनगर महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजला : १ आॅक्टोबरला अंतिम प्रभाग रचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 10:48 AM

महापालिका निवडणुकीचा बिगूल अखेर वाजला असून, राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी प्रभाग रचना, आरक्षण, सोडत व सुनावणी आदी कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे इच्छुकांची धावपळ सुरू होणार आहे.

अहमदनगर : महापालिका निवडणुकीचा बिगूल अखेर वाजला असून, राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी प्रभाग रचना, आरक्षण, सोडत व सुनावणी आदी कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे इच्छुकांची धावपळ सुरू होणार आहे. नगर महापालिकेची मुदत २९ डिसेंबर २०१८ रोजी संपत असल्याने निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ केला आहे. शुक्रवारी संभावित प्रभाग रचना, आरक्षण, सोडत व त्यावर अंतिम सुनावणी आदी कार्यक्रम जाहीर करण्यात आला. सन २०१७ च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. ९ अन्वये महानगरपालिकांमध्ये एकसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली. त्यानुसार महापालिकेची सदस्य संख्या विचारात घेऊन एका प्रभागात जास्तीत जास्त ४ सदस्य करायचे आहेत. सर्व प्रभाग ४ सदस्यांचे होत नसल्यास  एक प्रभाग ३ किंवा ५ सदस्यांचा होईल अथवा दोन प्रभाग ३ सदस्यांचे होतील. तसेच आरक्षण निश्चितीसाठी शासनाने महाराष्ट्र महानगरपालिका नियम २०१६ ( प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे व त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पद्धत) पारीत केले आहेत. त्यानुसार आरक्षित प्रभाग निश्चित करण्याकरिता कार्यवाही होणार आहे. या कार्यक्रमानुसार प्रारूप प्रभाग रचना करणे, आरक्षणाची सोडत काढणे, प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, त्यावर हरकती व सूचना मागवणे, सुनावणी देणे व अखेर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करणे ही कार्यवाही होणार आहे. महापालिका आयुक्तांना ही प्रक्रिया पूर्ण करायची असून, प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक असल्याचे निवडणूक आयोगाने कळवले आहे.दरम्यान, या प्रक्रियेमुळे इच्छुक अलर्ट झाले आहेत. आपल्या प्रभागाची काही तोडफोड होते का, प्रभागात आणखी भाग समाविष्ट होतो की दुसºया प्रभागात जातो, आरक्षण राहते की बदलते अशा अनेक हालचालींकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष राहणार आहे. 

प्रभाग रचना, आरक्षण कार्यक्रम असाप्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करणे - ७ आॅगस्टपर्यंत हा प्रस्ताव तपासणी करून आयोगाकडे पाठवणे - १३ आॅगस्टपर्यंतप्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणे - १८ आॅगस्टपर्यंतनागरिकांचा मागासवर्ग व महिला आरक्षण सोडत  - २४ आॅगस्टप्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्धी - २७ आॅगस्टप्रभाग रचनेवर हरकती, सूचना     - २७ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरहरकती व सूचनांवर सुनावणी    - १५ सप्टेंबरपर्यंत सुणावणीवर अंतिम निर्णय    - २८ सप्टेंबरपर्यंतप्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना प्रसिद्धी - १ आॅक्टोबर

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका