शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

अकोळनेरला हवी किसान रेल, कार्गो विमान सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 12:30 PM

सरकारने प्रायोगिक तत्वावर किसान रेल सुरु केली आहे. या रेल्वेची किती आवश्यकता आणि त्यात काय अडचणी येतात हे अकोळनेरच्या शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. अकोळनेरला किसान रेल तर हवीच. पण, विमानाची कार्गो सेवा शिर्डीवरुन सुरु झाली तर अकोळनेरच्या फूलशेतीचा डंका देशात आणखी जोरात गाजेल.

काळ्या मातीत मातीत/सुधीर लंके

--------------------‘लोकल’ साठी होकल व्हा असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. परंतु नगर तालुक्यातील अकोळनेर येथील शेतकऱ्यांनी हा मंत्र खूप पूर्वीपासून अवलंबला आहे. पारंपरिक पिकांऐवजी येथील शेतकºयांनी जाणीवपूर्वक फूलशेतीचा मार्ग निवडला व आपली बाजारपेठही सामुदायिकपणे स्वत:च शोधली. अकोळनेर हा फूलशेतीत एक पॅटर्न बनला आहे. देशातील फुलांची मंडी अकोळनेरने सजवली आहे.अहमदनगर शहरापासून दहा किलोमीटरवर असलेल्या अकोळनेरला बारमाही पाण्याचा स्त्रोत नाही. गावाजवळून वालुंबा नदी वाहते. पण ती हंगामी. विहीर, बोअरवेल याआधारे येथील शेतकºयांनी फूलशेती विकसित केली. उन्हाळ्यात पाणी कमी पडले तर पिकांसाठीही टँकर आणावे लागतात. अशा परिस्थितीत या गावाने गत तीन पिढ्यांपासून फूलशेतीचा मार्ग धरला.

शेवंती आणि झेंडू ही गावातील मुख्य पिके. शेवंतीत ‘रतलाम’ आणि ‘राजा’ या दोन जातीच्या फुलांची पैदास मोठ्या प्रमाणावर केली जाते. देशात गणपती ते नवरात्र या दरम्यान फुलांची मोठी मागणी असते. इतर राज्यांतील फुले गणपतीपूर्वी संपतात किंवा डिसेंबरनंतर सुरु होतात. अकोळनेरची फुले याच दरम्यान बाजारात येतात. दसरा हा सण असा आहे की त्यात नागपूर सारख्या भागातून पांढºया फुलांना मोठी मागणी असते. ही गरज अकोळनेर भरुन काढते. त्यामुळे नागपूरसारखी फुलांची मोठी बाजारपेठ नगरच्या अकोळनेरने काबीज केली आहे.

अकोळनेरची झेंडू, शेवंती ही फुले अगदी दिल्लीपर्यंत जात होती. अकोळनेरला डच गुलाबही पिकत होता. दिल्लीच्या फूलबाजारात अकोळनेरचा डंका वाजत होता. मात्र, आता हिमाचल प्रदेशात फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे हिमाचल प्रदेश अकोळनेरचा स्पर्धक बनला. अनिल मेहेत्रे हे शेतकरी सांगतात, ‘दिल्लीचे व्यापारी अगोदर आमचा माल घेत नव्हते. पडून भाव द्यायचे. मात्र, आम्ही तरीही फुले पाठवत गेलो. ग्राहकांना या फुलांचा एवढा मोह पडला की ते दिल्लीच्या व्यापाºयांकडे आमचीच ताजी फुले मागू लागले. अशा पद्धतीने आम्ही स्वत:चे मार्केट तयार केले.’ नगर रेल्वे स्थानकावरुन झेलम एक्सप्रेसने ही फुले दिल्लीत पोहोचायची. मात्र, या रेल्वेगाडीचा नगरचा थांबा हा पाच मिनिटांच्या आत आल्याने आता येथे मालडब्बाच उघडला जात नाही. पर्यायाने शेतकरी या रेल्वेने हा माल आता पाठवू शकत नाही.

फुलांच्या सजावटीत ‘जर्बेरा’ या फुलालाही आता खूप महत्त्व आहे. ही गरज ओळखून या शेतकºयांनी २०१२ नंतर पॉलिहाऊस उभारले व त्यात जर्बेरा पिकवायला सुरुवात केली. त्यासाठी शेतकºयांचे समूह तयार केले. जर्बेरा पिकविणारे तुषार मेहेत्रे सांगतात, ‘आम्ही शेतकरी सामूहिकपणे निर्णय घेतो. उत्पादनासाठी जी खते, औषधे व पॅकिंगसाठी जे साहित्य लागते ते सामूहिकपणे एकत्रच आणतो. उत्पादित मालही एकत्रच मार्केटला पाठवितो. त्यामुळे फसवणूक होत नाही’.

या शेतकºयांनी बाजारपेठेत माल विकताना आणखी एक तंत्र विकसित केले आहे. मार्केटला फुले गेल्यानंतर ती विक्रीसाठी एकाच व्यापाºयाकडे दिली जात नाहीत. एकाच मार्केटला चार-पाच व्यापाºयांकडे विभागून फुले दिली जातात. गावातून शेतकरी एकाच वेळी या सर्व व्यापाºयांना फोन करुन दर विचारतात. त्यामुळे व्यापारी एकमेकात साटेलोटे करुन दर पाडून फसवणूक करु शकत नाहीत. यातून व्यापाºयांमध्ये स्पर्धा टिकून राहते व शेतकºयांचे व्यापाºयांवर नियंत्रणही राहते. दसरा, दिवाळीत तर अकोळनेरचा घरटी एक व्यक्ती हा नागपुरात असतो. इकडून फुले पाठवली जातात, तो व्यक्ती तेथे व्यापारावर लक्ष ठेवतो.अकोळनेरचे सीताफळ लुधियानातपंजाबमधील लुधियानाला मोठा फळ बाजार भरतो. येथील फळ बाजारात अकोळनेरला पिकणारी बाळापुरी सीताफळे खूप प्रसिद्ध होती. अकोळनेरचे शेतकरी झेलम एक्सप्रेसच्या मालवाहू डब्यातून ही सीताफळे या बाजारात पाठवत होते. मात्र, झेलमचा मालवाहू डबा आता नगरच्या रेल्वे स्थानकावर उघडलाच जात नसल्याने अकोळनेर लुधियाना मार्केटला मुकले.विमानसेवा महागल्याचा फटकारेल्वेने फुले वेळेत पोहोचत नाहीत. दिल्लीला फुले पाठवायची झाल्यास चोवीस तासांहून अधिक काळ लागतो. औरंगाबादहून दिल्लीला विमान जाते. त्यामुळे या विमानाने शेतकºयांनी फुले पाठविण्यास सुरुवात केली. दुपारी फुले काढली तरी ती दुसºया दिवशी सकाळीच दिल्लीत असायची. नगर ते औरंगाबादपर्यंत वाहनातून फुले न्यायची. नंतर विमान. दिल्लीत विमानतळ ते मार्केटपर्यंत पुन्हा वाहन. यातही मोठा खर्च येऊ लागला. विमानाचे दरही वाढले. परिणामी विमानाद्वारे होणारी वाहतूकही बंद झाली. त्यामुळे आता हे शेतकरी सामूहिकपणे वाहन करतात व थेट नागपूर, मुंबई, बडोदा, हैद्राबाद या मार्केटला फुले पाठवितात.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMarketबाजार