शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
2
अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 
3
"भाजपाशी थेट लढाई असते तिथे काँग्रेस कमीच पडते"; ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा खोचक टोला
4
Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव?
5
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...
6
Haryana Assembly Election Results 2024 : बाजी हातातून निसटताना भाजपाने केली खेळी; हरयाणात या समि‍करणामुळे झाली उलथापालथ
7
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: जम्मू काश्मीरचा अंतिम निकाल हाती, पाहा कुठल्या पक्षाला किती जागा...
8
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...
9
सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'छपरीपणा सुरु करायला हवा...'
10
हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका
11
भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!
12
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
13
SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या
14
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?
15
जयराम रमेश यांनी डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला; निवडणूक आयोगाने प्रत्येक मिनिटांचे उत्तर दिले
16
Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे
17
ढोल वाजवले, फटाके फोडले; लाडू, जिलेबी वाटली, पण… काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांवर नामुष्की 
18
"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?
19
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा
20
'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी

पारनेरमध्ये दारुबंदीसाठी एल्गार

By admin | Published: August 24, 2016 12:20 AM

पारनेर : निघोज, जवळे, ढवळपुरी येथे दारूबंदीसाठी लढा दिल्यानंतर आता पारनेर तालुक्यात दारूबंदीसाठी लढा देण्याचा निर्धार राळेगणसिध्दी येथे पारनेर तालुका दारूबंदी कार्यकर्ते

पारनेर : निघोज, जवळे, ढवळपुरी येथे दारूबंदीसाठी लढा दिल्यानंतर आता पारनेर तालुक्यात दारूबंदीसाठी लढा देण्याचा निर्धार राळेगणसिध्दी येथे पारनेर तालुका दारूबंदी कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आला. तालुक्यातील प्रत्येक गावात दारूबंदीचा ठराव ग्रामसभेत मांडण्यात येणार असल्याचा निर्णयही घेण्यात आला.निघोज, जवळे,ढवळपुरी परिसरात महिला व पुरूषांनी मिळून एकत्रित चांगला लढा दिल्याने आता पारनेर तालुक्यात दारूबंदीचे वारे वाहू लागले आहे. दारूबंदी चळवळीचे प्रमुख बबन कवाद, रामदास घावटे, डॉ.महेंद्र झावरे यांच्या पुढाकाराने आता गावागावात दारूबंदीसाठी चळवळी सुरू झाल्या आहेत. दारूबंदी करताना आधी प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामसभा, मासिकसभेत दारूबंदीचे ठराव घेण्याचे निश्चित करण्यात आले. राळेगणसिध्दीच्या बैठकीत बोलताना बबन कवाद म्हणाले, निघोज दारूबंदीचा लढा देताना अनेक अडचणी आल्या. त्याला आपण सर्वजण धैर्याने सामोरे गेलो, महिला व ग्रामस्थांनी साथ दिल्याने निघोज दारूबंदी यशस्वी झाली.जवळे येथील दारूबंदी चळवळीचे प्रमुख रामदास घावटे म्हणाले, दारूबंदी करताना प्रत्येक गावात आपले शत्रू तयार होत असल्याने आमच्यासह कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल होत आहेत, परंतु समाजाची पिढी वाचविण्यासाठी आपल्याला लढा द्यावाच लागणार आहे.यावेळी दारूबंदी समितीच्या महिला कार्यकर्त्या कांता लंके, पूजा रसाळ, रंजना पठारे, वैशाली भालेराव आदींनी दारूबंदी करताना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. यावेळी हेरंब कुलकर्णी, अ‍ॅड.रंजना गवांदे यांनीही दारूबंदी चळवळीची माहिती दिली. (तालुका प्रतिनिधी) निघोजमधील दारूबंदीने राज्यात नवा इतिहास रचला आहे. आपण आता राज्यात दारूबंदीसाठी जनजागृती करणार असून दारू विकेत्यांवर कारवाई होण्यासाठी महिलांचे ग्रामसुरक्षा दल उभारून त्यांना काही अधिकार देण्याची मागणी करणार आहोत. मुख्यमंत्री व मंत्री सकारात्मक असून लवकरच याचा मसुदा तयार होत आहे. आता कार्यकर्त्यांनी जनजागृती करून दारूबंदी प्रत्येक गावात होण्यासाठी प्रयत्न करावे, असे ंआवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.