शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

अर्बन बँकेस सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार प्रदान

By admin | Published: April 24, 2016 11:07 PM

अहमदनगर : नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या सहकार क्षेत्रातील उत्तम कामगिरीची दखल घेऊन सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार व गौरव प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.

अहमदनगर : महाराष्ट्र अर्बन को-आॅप. बँक्स असोसिएशनच्यावतीने येथील नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या सहकार क्षेत्रातील उत्तम कामगिरीची दखल घेऊन सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार व गौरव प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बँकेचे उपाध्यक्ष शैलेश मुनोत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी आ. प्रशांत परिचारिक, बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, बँकेचे संचालक अनिल कोठारी, अजय बोरा आदि उपस्थित होते.स्वातंत्र्यपूर्व काळातील स्थापनेनंतर शतकोत्तर वाटचाल करताना सहकाराच्या जुन्या संस्काराची कास धरुन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत अर्बन बँकेने सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार, बँकींग व्यवहार करणारे हितचिंतक व त्यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांची विश्वासार्हता जपत प्रगती केली आहे़ बँकेच्या या कामाची दखल घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला़ पुरस्कार देताना सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अर्बन बँकेबद्दल गौरवोद्गार काढले.