शहरं
Join us  
Trending Stories
1
लेक लाडकी योजनेचे काय झाले? तुम्ही केलेले काम लोक विसरले वाटतेय का; वर्षा गायकवाडांचा शिंदेंना टोला
2
संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा संपन्न; उद्या सकाळी आजोळघरातून होणार प्रस्थान
3
“मनोज जरांगे हे तर राजकारणाचे आयकॉन, १० दिवसांत...”; अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान
4
“काँग्रेसला जमत नाही म्हणून भाजपा-शिंदे गट सत्तेत आहे”; बच्चू कडूंचा खोचक टोला
5
“लोकसभेत धसका, आता विधानसभेला आग्रहाची विनंती आहे की...”; शरद पवारांचे PM मोदींना साकडे!
6
माझं मन सांगतंय दक्षिण आफ्रिका जिंकायला हवी, पण...! Shoaib Akhtar चं फायनलपूर्वी मोठं भाकित
7
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर; माता भगिनींनी CM एकनाथ शिंदेंना बांधल्या राख्या
8
कर्नाटक काँग्रेसमध्ये कलह! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाद?; डीके शिवकुमार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना
9
"अतिरिक्त अर्थसंकल्पाला मान्यता नसताना जीआर काढणे हा हक्कभंग’’, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप 
10
भाजपातून जदयूत आले, नितीशकुमारांनी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष केले; उत्तराधिकारी की...?
11
बाईकची चाचणी देऊन मिळवलं क्रेन चालवण्याचे लायसन्स; अंधेरी RTO च्या भ्रष्टाचावरुन वडेट्टीवारांचे ताशेरे
12
"आपल्याकडे हिरो ठरवतो सिनेमाची हिरोईन", संस्कृती बालगुडेनं सांगितलं सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव
13
सशक्त पक्षसंघटना, मोदी, योगींची लोकप्रियता, तरीही UPमध्ये भाजपाचा पराभव का झाला? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
14
“लोकसभेत १५५ विधानसभा मतदारसंघात भाजपा पराभूत, इथे सत्ता बदलणारच...”: शरद पवार
15
भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेची बेक्कार धुलाई; क्रिकेट विश्वात नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड
16
पुण्यातील पब्स आणि बारवर महापालिकेची कारवाई, मराठी अभिनेता म्हणतो- "इतकी वर्ष मोकाट चालू दिलं..."
17
गजकेसरी योग: ८ राशींना लाभच लाभ, भाग्याचा काळ; यश-प्रगती, पदोन्नती-नफा कमवायची संधी!
18
काय हे आयसीसी...! विजेत्या संघाला किती बक्षीस मिळणार? IPL पेक्षा काही लाखच जास्त...
19
बुलडोझर बाबाचा बुलडोझर गरीब आणि मागासवर्गीयांवर का? पवईतील अतिक्रमण कारवाईवरुन विजय वडेट्टीवार आक्रमक
20
पेपरफुटीविरोधात राज्य सरकार कडक कायदा करणार का? नाना पटोले यांचा सवाल

सदस्य-अधिकारी यांच्यात खडाजंगी

By admin | Published: August 26, 2014 11:13 PM

अहमदनगर: जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे व समाज कल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांच्यात मंगळवारी दुपारी चांगलीच बाचाबाची झाली़

अहमदनगर: जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे व समाज कल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांच्यात मंगळवारी दुपारी चांगलीच बाचाबाची झाली़ घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयात एकच गोंधळ उडाला़ दरम्यान या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद करून मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांचे दालन गाठले़ मात्र ते उपस्थित नव्हते़ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप यांच्याशी चर्चा झाल्यानंतर वाद निवळला़ जिल्हा परिषदेत समाज कल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांच्या दालनात दुपारी जिल्हा परिषद सदस्य परमीवर पांडुळे आले़ पांडुळे यांनी दलितवस्ती सुधार योजना आराखड्यातून आपल्या गटातील दहा गावांची नावे का वगळली, अशी विचारणा भोगले यांच्याकडे केली़ त्यावर तालुका गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या गावांचा समावेश करण्यात आला आहे़ लोकसंख्येच्या निकषानुसार गावांची निवड केली जात असल्याचे भोगले यांनी सांगितले़ मात्र पांडुळे यांचे समाधान झाले नाही़ गटातील गावे वगळल्यावरून दोघांमध्ये बाचाबाची होऊन पांडुळे दालनातून निघून गेले़ या घटनेनंतर समाजकल्याण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या दालनाकडे धाव घेतली़ परंतु नवाल उपस्थित नव्हते़ त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप यांच्याकडे मोर्चा वळविला़ कर्मचाऱ्यांनी जगताप यांची भेट घेऊन घडला प्रकार त्यांच्या कानावर घातला़ जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून, त्यांनी याविषयी संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याचे समजते़ याविषयी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजले़ परंतु याविषयी भोगले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़ (प्रतिनिधी)अधिकारी पोलीस ठाण्यातसमाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले हे पांडुळे यांच्याविरोधात फिर्याद दाखल करण्यासाठी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.