शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

भंडारदरा @५०

By admin | Published: July 14, 2016 1:22 AM

अकोले : घाटघर-रतनवाडीसह हरिश्चंद्रगड परिसरात पावसाचे तांडव थंडावले असले तरी पाऊस सरींचा हिंदोळा सुरू आहे. बुधवारी दिवसभर तालुक्यात सर्वदूर घननिळे आभाळ होते.

अकोले : घाटघर-रतनवाडीसह हरिश्चंद्रगड परिसरात पावसाचे तांडव थंडावले असले तरी पाऊस सरींचा हिंदोळा सुरू आहे. बुधवारी दिवसभर तालुक्यात सर्वदूर घननिळे आभाळ होते. काही ठिकाणी सायंकाळी दमदार सरी बरसल्या. सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ५ हजार ४७० दशलक्ष घनफूट इतका झाला होता.तालुक्यातील पूर्व व पठार भागात शेतजमीन वापशाची वाट पाहावी लागत असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत़ पश्चिम घाटमाथ्यावर भात आवणीची लगबग वाढली आहे. मंगळवारी पडलेल्या पावसाची बुधवारी सकाळी झालेली नोंद कंसात यंदाचा एकूण पाऊस :-भंडारदरा-४८ (७२४), घाटघर- ५० (१ हजार ५३५), रतनवाडी- ८८ (१ हजार ६१३), पांजरे-९६ (१ हजार ११७), वाकी-८७ (८९७), निळवंडे-५(३१९), अकोले-२५ (४१०), कोतूळ- ९ (२७०), आढळा-२ (१३३) मिलीमिटर. पिंपळगाव खांड येथे मुळा नदीचा १० हजार ३४२ क्युसेक इतका विसर्ग होता. आंबित, बलठण, पिंपळगाव खांड, देवहंडी, कोथळे, वाकी, टिटवी,पाडोशी, सांगवी, घोटी-शिळवंडी, बदगी बेलापूर, येसरठाव हे लघु पाटबंधारे प्रकल्प ओसंडून वाहू लागला आहे. अकोले शहर व निळवंडे धरण क्षेत्रातही दिवसभर दमदार सरींचा कोसळल्या असून भंडारदरा धरणा बरोबरच निळवंडेच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सकाळचा पाणीसाठा : भंडारदरा-५ हजार ४७०, निळवंडे- २ हजार २१३, आढळा- २९२ दशलक्ष घनफूट़ (तालुका प्रतिनिधी)