शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

पाण्यात मृत जनावरांची हाडे

By admin | Published: March 19, 2016 12:06 AM

मिलींदकुमार साळवे, श्रीरामपूर पिण्याच्या पाण्याचा प्रवास प्रवरा डाव्या कालव्यातून श्रीरामपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावापर्यंत होतो.

मिलींदकुमार साळवे, श्रीरामपूरपिण्याच्या पाण्याचा प्रवास प्रवरा डाव्या कालव्यातून श्रीरामपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावापर्यंत होतो. नॉर्दन ब्रँचपासून साठवण तलावाकडे फाटा फुटतो़ तेथून संजयनगरकडे जाणाऱ्या साई रेल्वे भुयारी मार्गापर्यंत पाटाची स्थिती थोडी बरी आढळली़ पुढे सुखदा हौसिंग व अहिल्यादेवीनगरमध्ये पाण्याचा नाही तर कचऱ्याचाच पाट वाहतो़ या पाण्यात मृत जनावरांची हाडे, चिंध्या, केरकचरा अशी घाण वाहताना आढळून आली़ नॉर्दन ब्रँचपासून साठवण तलावाकडे जाणाऱ्या पाटाचे ‘लोकमत’ने शुक्रवारी स्टींग आॅपरेशन केले़ श्रीरामपूरला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या साठवण तलावात पाटाद्वारे पाणी सोडलेले आहे़ मात्र, या पाटातच मृत जनावरे, केर कचरा टाकला जात असल्याचे वास्तव या स्टींग आॅपरेशनमधून ‘लोकमत’ने उघडकीस आणले़ श्रीरामपूरकर पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिनची प्रक्रिया होऊन प्यायला मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रवास तुमचेही डोळे गरगरायला लावणारा आहे़ येत्या २ एप्रिलला निळवंडे धरणातून आवर्तन सुटणार आहे. प्रवरा डाव्या कालव्यातून येणाऱ्या आवर्तनाच्या पाण्याने श्रीरामपूर नगरपालिकेचा साठवण तलाव भरला जाणार आहे. या पाटाची पाहणी शुक्रवारी केली़ तेव्हा प्रवरा कालवा हा पाण्याचा पाट नाही तर कचऱ्याचा पाट झाल्याचं दिसलं़ या पाटामधूनच तलावात पाणी सोडलं जातं. संजयनगरकडे जाणाऱ्या साई भुयारी पुलापासून ते गोंधवणी रस्त्यावरील पुलापर्यंत पाटात चिंध्या, ओवळ्या-सोवळ्याचे कपडे, केरकचरा ठिकठिकाणी दिसत होता. इमॅन्युएल चर्चच्या परिसरात गोपीनाथनगर व संजयनगरच्या घरांमधील मोऱ्यांचे घाण पाणी, सांडपाणी व इतर सांडपाणीही थेट पाटात सोडण्यात आलंय. त्यासाठी चर्चजवळच रस्ता खोदून खास पाईप टाकून गोपीनाथनगरच्या घरांमधील घाण पाणी पाटात सोडलं आहे. या घाणीमुळे अहिल्यादेवीनगरमधील पाटाच्या कडेला राहणारे नागरिक डासांमुळे त्रस्त आहेत. या काही घरांमधीलही मोऱ्यांचं पाणीही पाटातच जातं. याच पाटातून पाणी नगरपालिकेच्या साठवण तलावात जातं़सहज वॉशिंग प्रोजेक्टसमोर ज्याठिकाणाहून पाटाचे पाणी साठवण तलावाकडे वळते, त्याजवळच मेलेलं जनावर पाटाच्या मधोमध पडलेलं. त्यावर कावळे तुटून पडले होते. प्रभाग २ मधील जलकुंभ भरणारी एक जलवाहिनी गोंधवणी-पुणतांबा रस्त्यावरील पुलाखालून जाणाऱ्या पाटातूनच जाते. या जलवाहिनीस कचरा, घाण पाण्याचा वेढा पडलेला आहे़ ही पाईपालईन फुटल्यास पाटातील ही घाण थेट पाईपलाईनद्वारे नागरिकांच्या घरात पोहोचण्याचा धोका नाकारता येत नाही़