शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

जादुई दुनियेत रमली बाल विकास मंचची मुले

By admin | Published: August 09, 2016 11:52 PM

अहमदनगर : जादूच्या दुनियेत रमण्यासाठी आतूर झालेली मुले... स्टेजचा पडदा उघडला अन् सर्वांची डायरेक्ट एन्ट्री झाली ती देशातील सुप्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या जादूच्या दुनियेत

अहमदनगर : जादूच्या दुनियेत रमण्यासाठी आतूर झालेली मुले... स्टेजचा पडदा उघडला अन् सर्वांची डायरेक्ट एन्ट्री झाली ती देशातील सुप्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या जादूच्या दुनियेत. लोकमत बाल विकास मंचच्या वतीने सदस्यांसाठी नंदनवन लॉन येथे जादूच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन बाल विकास मंच सभासद नोंदणी (२०१६-१७) चे मुख्य प्रायोजक साई सूर्य नेत्र सेवाचे डॉ.प्रकाश कांकरिया, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, आठरे पाटील पब्लिक स्कूलचे कर्नल डी.ए. पाटील, कै.वि.ल. कुलकर्णी शाळेच्या सुनंदा धिमते, समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे डी.एम. कासार, बाणेश्वर विद्यालयाचे भाऊसाहेब वाकचौरे, मार्कंडेय विद्यालयाचे क्षेत्रे, महाराष्ट्र बालक मंदिरचे सुरेश शेवाळे, सुनील कोतकर आदी मान्यवरांच्या हस्ते लोकमतचे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने झाले.या कार्यक्रमात जादूगार जितेंद्र यांनी प्रेक्षकांसमोर पत्त्यांचे खेळ, मिस्ट्रीयस सिलींडर फ्रॉम सिंगापूर, झिकझ्याक बॉय, डबल एक्स्चेंज मिस्ट्री, द फ्लार्इंग बॉक्स असे एक ना अनेक जादूचे प्रयोग सादर केले. गिलोटीन हा जिवंत माणसाची मान कापणारा खेळ पाहून लहानांसोबत मोठेही अवाक् झाले. तसेच द आर्म, इल्युजन, इंडियन रोप ट्रीक हुड विथ हॅकर चीज, द ग्लास अ‍ॅण्ड बॉटल, ट्यूब आॅफ इल्युजन अशा असंख्य जादुई प्रयोगांनी बच्चे कंपनींची मने जिंकली. सम थिंग फॉर्म नथींग तसेच एका रूमालाचे दोन रूमाल करणे असे जादूचे प्रयोग यावेळी रंगले. कार्यक्रमाला अत्युच्च उंचीवर घेऊन जाणारा प्रयोग म्हणजे टेबलावर माणसाचे दोन तुकडे करणे. या कार्यक्रमास बच्चे कंपनींनी भरभरून प्रतिसाद दिला. जाड पत्र्यातून माणूस आरपार, माणूस नाहीसा करणे, खाल्लेला चेंडू कानातून बाहेर काढणे या सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय जादूंनी प्रेक्षकांचे मन खिळवून ठेवून जितेंद्र रघुवीर यांनी धम्माल उडवून दिली. लहान मुलांची गर्दी, टाळ्यांचा कडकडाट, वन्स मोअरची दाद, हसण्याचा आवाज, चिमुकल्यांची उत्सुकता, चेहऱ्यावरचे आश्चर्याचे हावभाव हे कसे घडले, या विचारात रंगलेल्या जादूच्या प्रयोगांनी बाल चमूंनी मनसोक्त आनंद लुटला.(प्रतिनिधी)