शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

ढग येती अन् जाती; आशेची होतीय माती, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा

By साहेबराव नरसाळे | Published: July 23, 2023 7:23 PM

जिल्ह्यात या वर्षी खरिप हंगामाच्या सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी लांबली.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : मागील ५ दिवसांपासून रोज ढग येतात. त्यापाठोपाठ हवामान खात्याचा पावसाचा इशाराही येतो. मात्र, पाऊस न पडता ढग तसेच निघून जातात. आभाळाकडे नजरा लावून बसलेला शेतकरी पुन्हा माना टाकलेल्या पिकांकडे पाहत ओशाळून जातो, असे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. मागील पाच दिवसात जिल्ह्यात अवघा १९ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे जमिनीत असलेली ओलदेखील झपाट्याने कमी होत आहे. परिणामी पिके सुकू लागली आहेत.

    जिल्ह्यात या वर्षी खरिप हंगामाच्या सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी लांबली. हंगाप पूर्णपेण वाया जाऊ नये म्हणून थोड्याशा ओलीवर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. पेरणीनंतर तरी चांगला पाऊस होईल व पिके जोमाने येतील, या आशेवर शेतकरी होता. मात्र, पेरणीनंतरही पावसाने पाठ फिरवली. उगवून आलेली पिके आता माना टाकू लागली आहेत. आता दुबार पेरणीची वेळही निघून गेली आहे. त्यामुळे उगवून आलेले पिक वाचावे, यासाठी शेतकऱ्यांची तगमग सुरु आहे. पावसाची रोज वाट पाहत आहेत. रोज ढग येतात अन् निघून जातात. पाऊस काही पडत नाही.मागील पाच दिवसातील पाऊसदिनांक          झालेला पाऊस१९ जुलै          १४.२ मिली२० जुलै          ०.६ मिली२१ जुलै            १.१ मिली२२ जुलै            २.७ मिली२३ जुलै              ०.५ मिलीएकूण                  १९.२ मिलीसंगमनेर तालुक्यात अवघी २० टक्के पेरणीसंगमनेर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात अत्यंत कमी म्हणजेच अवघी २० टक्के पेरणी झाली आहे. संगमनेर तालुक्यात खरिपाचे ५० हजार ८५० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी १० हजार ५६७ हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल कर्जत तालुक्यात ३९ टक्के पेरणी झालेली आहे. कर्जत तालुक्यात खरिपाचे ५२ हजार ३९६ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी २० हजार ७८४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.धरणांमधून पाणी सोडलेधरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. भंडारदरा धरणातून प्रवरा नदी ८३५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रात १२५० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. कुकडी प्रकल्पाच्या पाणलोटातून भिमा नदीत १७५४४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

टॅग्स :Rainपाऊस