शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
3
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
4
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
5
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
6
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
7
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
8
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
9
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
10
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
11
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
14
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
15
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
16
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
17
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
18
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
19
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
20
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका

रस्त्याच्या निविदेवरुन रंगला कलगीतुरा

By admin | Published: August 17, 2016 12:30 AM

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील प्रमुख रस्त्याच्या निविदेवरुन सध्या चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील प्रमुख रस्त्याच्या निविदेवरुन सध्या चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. १७ रस्त्यांच्या कामाची एल.बी. कुंजीर यांची ३६ कोटी ९२ लाख रुपयांची १०.१० टक्के जादा दराची निविदा डावलून मे. आर.आर.कपूर यांची ३६ कोटी ९४ लाख रुपयांची ९.९० टक्के जादा दराची निविदा सत्ताधारी नगरसेवकांनी मंजूर केली मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरनिविदा बोलविल्यानंतर कपूर यांनी २६.५७ टक्के कमी दराने म्हणजे २४ कोटी ६२ लाख रुपयांस फेर निविदा भरली असल्याने श्रीगोंदा नगरपालिकेचे १२ कोटी ३२ लाख रुपये वाचले आहेत. माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख उच्च न्यायालयात गेले म्हणून ही रक्कम वाचली आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. तुकाराम दरेकर यांनी केला आहे सर्वसाधारण सभेत अख्तर शेख यांनी चुकीच्या निविदा प्रक्रियेला विरोध केला होता व मुख्याधिकाऱ्याने फेर निविदा बोलविण्याची शिफारस केली होती. परंतु सत्ताधारी नगरसेवकांनी कपूर यांची निविदा मंजूर केली. त्या विरोधात शेख यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून निविदा प्रक्रियेला आव्हान दिले होते. १८ डिसेंबर २०१५ रोजी न्यायालयाने या निविदा प्रक्रियेचा आढावा घेऊन शासनाला फेर टेंडर काढण्याचे आदेश दिले होते. तसेच श्रीगोंदा नगरपालिकेने निविदा मागवून त्या उघडल्या असता ३, ११ टक्के आणि २६.५७ टक्के कमी दराच्या निविदा आल्या. कपूर यांनी पहिल्या निविदेपेक्षा आताची निविदा १२ कोटी ३१ लाख ६२ हजार ९१६ रुपयांनी कमी भरलेली आहे. कपूर यांनी पहिल्या निविदेपेक्षा ३६.७६ टक्के दर कमी कसा केला ? याचे उत्तर सत्ताधारी नगरसेवकांनी द्यावे, असे आव्हान दरेकर यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)