संगमनेरात संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला मारले जोडे

By शेखर पानसरे | Published: July 31, 2023 12:06 PM2023-07-31T12:06:53+5:302023-07-31T12:07:36+5:30

काँग्रेसचे आंदोलन : अटक करण्याची मागणी.

congress agitation against sambhaji bhide in sangamner | संगमनेरात संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला मारले जोडे

संगमनेरात संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला मारले जोडे

googlenewsNext

शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर : महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांना तातडीने अटक करावी. अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. सोमवारी (दि.३१) संगमनेर बसस्थानकाच्या बाहेर आंदोलन करत भिडे यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

संगमनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, काँग्रेसचे संगमनेर तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, गौरव डोंगरे, निखिल पापडेजा यांसह शहर आणि तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

राष्ट्रपती महात्मा गांधी यांनी समता, शांतता, अहिंसा, बंधुत्वाचा मार्ग देशाला दाखवला.  त्यांच्याविषयी संभाजी भिडे यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे असून त्यामुळे संपूर्ण देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत. अशी मागणी यावेळी करण्यात आली. अटक न झाल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Web Title: congress agitation against sambhaji bhide in sangamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.