विधानसभेच्या १२ पैकी सात जागा काँग्रेसकडे घ्या; जिल्हाध्यक्षांची पक्षश्रेष्ठींकडे केली मागणी

By अरुण वाघमोडे | Published: July 3, 2024 06:31 PM2024-07-03T18:31:21+5:302024-07-03T18:31:49+5:30

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी मंगळवारी भेट घेऊन दिले मागणीचे पत्र

Congress should take seven of the 12 seats in the Legislative Assembly The district president made a demand to the party leaders | विधानसभेच्या १२ पैकी सात जागा काँग्रेसकडे घ्या; जिल्हाध्यक्षांची पक्षश्रेष्ठींकडे केली मागणी

विधानसभेच्या १२ पैकी सात जागा काँग्रेसकडे घ्या; जिल्हाध्यक्षांची पक्षश्रेष्ठींकडे केली मागणी

अरुण वाघमोडे, अहमदनगर: जिल्ह्यात विधानसभेचे बारापैकी संगमनेर, श्रीरामपूर व शिर्डी हे तीन मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत मात्र, नगर शहर, श्रीगोंदा, कोपरगाव आणि अकोले या मतदारसंघातही पक्षाची चांगली ताकद आहे. त्यामुळे अगामी विधानसभा निवडणुकीत हे चारही मदारसंघ पक्षाकडे घ्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.

याबाबत वाघ यांनी या दोन्ही नेत्यांची मंगळवारी भेट घेऊन त्यांना पत्र दिले आहे. वाघ यांनी म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. या विजयात काँग्रेसच सिंहाचा वाटा आहे.

जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. यात शिर्डी शिवसेना तर अहमदनगर राष्ट्रवादीकडे आहे. विधानसभेच्या एकुण १२ जागा आहेत. यापैकी आपल्या काँग्रेसकडे संगमनेर, श्रीरामपूर व शिर्डी अशा केवळ तीनच जागा आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला आणखी ४ जागा मिळणे गरजेचे आहे. त्यात श्रीगोंदा, नगर शहर, कोपरगांव व अकोला या जागा प्रधान्यक्रमाने घेणे गरजेचे असून जिल्ह्यातील या सातही मतदारसंघात आपल्या पक्षाची खूप चांगली ताकद असून या मतदारसंघातून आपल्या नेतृत्वातून व पक्ष संघटनामुळे पक्षाचे उमेदवार नक्कीच विजयी होतील. त्यामुळे १२ पैकी ७ विधानसभा मतदार संघ काँग्रेसकडे घ्यावेत, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

Web Title: Congress should take seven of the 12 seats in the Legislative Assembly The district president made a demand to the party leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.