शहरं
Join us  
Trending Stories
1
'कोल्हापूरच्या नेत्याला आम्ही राजे म्हणणार नाही', लक्ष्मण हाकेंचे संभाजीराजेंवर आरोप; रात्री काय घडलं सगळंच सांगितलं
2
खळबळजनक दावा! देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर गुप्त भेट; दिल्लीतही बैठक?
3
अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी, स्वत:च्याच बंदुकीतून झालं मिसफायर; रुग्णालयात दाखल
4
शेतकऱ्यांनो, शेतीपंपाचे कसलेच वीजबिल भरू नका; अजित पवार यांचा शेतकऱ्यांना ‘अर्थ’पूर्ण सल्ला
5
भाजपचे उमेदवार कोण? तिकीट देण्यासाठी नवा प्रयोग, पक्षाचे पदाधिकारी लिफाफ्यात नावे देणार
6
अमित शाह आज पुन्हा महाराष्ट्रात; मुंबई, ठाणे, पालघरच्या मतदारसंघाचा घेणार आढावा
7
"गरबा खेळण्यासाठी गोमूत्र प्यायला देऊन प्रवेश द्यावा", भाजपा नेत्याचा सल्ला
8
गेट वेल सून! सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, समोर आलं मोठं कारण
9
Laxman Hake News : 'मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला', लक्ष्मण हाकेंचा आरोप; रात्री नेमकं काय घडलं?
10
"सरकारी सबसिडीच्या भरवशावर राहू नका"; गडकरींच्या विधानावरुन देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
ईडीच्या एफआयआरनंतर सिद्धरामय्या यांची पत्नी भूखंड परत करण्यास तयार; एमयूडीएला लिहिले पत्र
12
इस्रायली सैन्य रातोरात लेबनॉनमध्ये घुसले; हजारो रणगाडे, हिजबुल्लाहच्या ठिकाणांना केले लक्ष्य
13
LPG Cylinder Price : नवरात्रीपूर्वीच झटका, एलपीजी सिलिंडर महागला; पाहा दिल्ली ते मुंबईचे नवे दर
14
सोनम वांगचुकसह १३० आंदोलक पोलिसांच्या ताब्यात; राहुल गांधी म्हणाले, "तुमचा अहंकार..."
15
महाराष्ट्राचे सहा आमदार पाचवी पास, फक्त १०वी शिकलेले ४४; पहा मतदारांनी निवडलेल्या नेत्यांचे शिक्षण...
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शारीरिक आरोग्य उत्तम, वर्तनावर संयम ठेवावा लागेल
17
राजकारणापासून किमान देवाला तरी लांब ठेवा हो! सर्वाेच्च न्यायालयाचे तिरुपती लाडू भेसळीवर प्रश्नचिन्ह
18
कुणबी प्रमाणपत्रे मिळणे आणखी सोपे; शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला
19
देशी गाय आता ‘राज्यमाता-गोमाता’; मंत्रिमंडळाचा निर्णय : लगेच आदेशही जारी
20
‘किल्लारी’च्या दिवशीच भूकंपाने हादरले मेळघाट; अमरावती, अकोला जिल्ह्यात धक्के; भिंतीला तडे; नागरिकांना झाले धस्स

इंदौरपर्यंत जाऊनही बीएनपी गुंतवणूकदारांची निराशा

By admin | Published: July 31, 2016 12:58 AM

अहमदनगर : बीएनपी रिअल इस्टेट अ‍ॅण्ड अलाईड लि. या कंपनीत चिटफंडपोटी गुंतवणूकदारांची अडकलेली रक्कम काढण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.

अहमदनगर : बीएनपी रिअल इस्टेट अ‍ॅण्ड अलाईड लि. या कंपनीत चिटफंडपोटी गुंतवणूकदारांची अडकलेली रक्कम काढण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. रक्कम मिळावी म्हणून काही एजंटांनी थेट या कंपनीचे मुख्य कार्यालय असलेल्या इंदौर येथे चकरा मारल्या. मात्र, तिथे त्यांची बोळवण करण्यात आली. त्यानंतर या एजंटांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली परंतु पोलिसांकडूनही प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, ग्राहक मंचातही एक तक्रार दाखल आहे.बीएनपी या साखळी प्रकारातील व्यवसायात जिल्हाभरातील सुमारे २० हजार ग्राहकांची ६० कोटींच्या पुढे रक्कम अडकलेली असून, १५ दिवसांपूर्वी नगरमधील कंपनीचे कार्यालयही बंद झाल्याने गुंतवणूकदारांत खळबळ उडाली. याबाबत ‘लोकमत’ने हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर तक्रार केलेल्या गुंतवणूकदार, एजंटांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. गुंतवणुकीचे पैसे मिळत नसल्याने धास्तावलेल्या एजंटांनी कंपनीशी संपर्क करून पैशाबाबत विचारणा केली, परंतु ठोस आश्वासन मिळाले नाही. तीन महिन्यांपूर्वी साधारण २० एजंट इंदोर येथे कंपनीच्या मुख्य कार्यालयात जाऊन आले. तेथील अधिकाऱ्यांकडून त्यांना महिनाभरात पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले, परंतु तेही हवेत विरले. त्यानंतर सर्वांनी मिळून पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली, तरी पोलिसांकडून अद्याप तपासात काहीही प्रगती नाही.दरम्यान, याच एजंटांनी ग्राहक मंचातही तक्रार दिलेली आहे. या प्रकरणाचा गवगवा झाल्याने आता गुंतवणूकदार पुढे येत असून पोलिसांत आणखी तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी दाद देत नाहीत. आम्ही सर्वजण इंदोर येथे जाऊन आलो, परंतु निराशा झाली. आता तर ते फोनही घेत नाहीत. गुंतवणूकदारांत प्रचंड संताप आहे. पोलिसांनी चौकशी केली तर यातून काहीतरी मार्ग निघू शकतो. सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत.-दीपक कुलकर्णी, केडगाव, गुंतवणूकदार, एजंट. बरीचशी गुंतवणूक ही नातेवाईक, मित्रांमध्येच असल्याने ते संयम ठेवून आहेत, परंतु कधी ना कधी रक्कम द्यावीच लागेल. लाखोंची रक्कम अडकल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. पोलिसांकडे तक्रार केली आहे. यातून योग्य तो मार्ग काढावा, एवढीच अपेक्षा आहे. - सुनील राजुळे, श्रीरामपूर, गुंतवणूकदार, एजंट.