शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

रडू नका, आता लढायला शिका

By admin | Published: July 20, 2016 11:44 PM

बाळासाहेब काकडे -कुळधरण मॅडम... छकुली आमची जीवलग मैत्रीण होती, तिच्या आठवणीविना आमचा तासही जात नाही. छकुलीला ज्यांनी हाल हाल करून मारले त्यांचे हात पाय मोडून त्यांना फाशी द्या,

बाळासाहेब काकडे -कुळधरणमॅडम... छकुली आमची जीवलग मैत्रीण होती, तिच्या आठवणीविना आमचा तासही जात नाही. छकुलीला ज्यांनी हाल हाल करून मारले त्यांचे हात पाय मोडून त्यांना फाशी द्या, अशी भावनिक इच्छा छकुलीच्या मैत्रिणींनी पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे व्यक्त केली. यावेळी रश्मी शुक्ला यांनी स्वत:च्या भावनांना आवर घालीत मुलींना सावरले. रडू नका, आता लढायला शिका, असा धीर त्यांनी दिला. कुळधरण (ता. कर्जत) येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील मुलींशी रश्मी शुक्ला यांनी बुधवारी संवाद साधला. यावेळी छकुलीची मैत्रीण वृषाली भवाळ हिने आरोपीच्या विरोधात कठोर भूमिका घ्या, अशी मागणी केली. हे सांगत असताना तिने हंबरडाच फोडला. त्यामुळे विद्यालयाचा परिसर भावुक झाला होता. रश्मी शुक्ला म्हणाल्या, तुम्ही बहादूर मुली आहात. अभ्यासाबरोबरच व्यायाम करा, खूप खेळा. अपप्रवृत्तीच्या विरोधात एकत्र या. तुमच्याकडे कुणाची मान वर करून पाहण्याची हिंमत होणार नाही. फक्त स्वत:वर विश्वास ठेवा. तुमचा कोणी छळ केला, कोणी विनाकारण त्रास दिला तर तुम्ही सुरुवातीला आई, वडिलांना सांगा नंतर पोलिसांना कल्पना द्या. आम्ही अशा प्रवृत्तींचा समाचार घेऊन तुम्हाला न्याय मिळेल, असा ठाम विश्वास देते. मुली, महिलांना तत्काळ मदत मिळण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी ‘प्रतिसाद’ नावाने अ‍ॅप विकसित केले. तुम्ही तुमच्या अगर पालकांच्या मोबाईलवर हे अ‍ॅप डाऊनलोड करून घ्या. तुम्ही एक क्लिक करा, तुम्हाला काही तासातच पोलिसांची मदत मिळेल किंवा नगर पोलिसांचा व्हॉटस्अपवर (नंबर ८६०५९११२१३) मेसेज करा, तुमच्या तक्रारीची दखल घेण्यात येईल. कुळधरण येथे पोलीस चौकी सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर रश्मी शुक्ला म्हणाल्या हा शासनाच्या अखत्यारीतला विषय आहे, परंतु गुरुवारपासून जिल्हा पोलीस प्रमुख सौरभ त्रिपाठी यांनी कुळधरणला पोलीस मदत केंद्र सुरू करावे, असे आदेश दिले. यावेळी नाशिकचे पोलीस आयुक्त विनयकुमार चोभे, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. सौरभ त्रिपाठी, अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, जि. प. अध्यक्षा मंजुषा गुंड, प्रतिभा पाचपुते, सुनीता शिंदे, बाळासाहेब नाहाटा, बापूसाहेब गुंड आदी उपस्थित होते. मी तुमच्यासारखी होतेमुलींनो मी तुमच्यासारखी सरकारी शाळेत शिकले. त्यावेळी शिक्षण घेताना खूप अडचणी होत्या. तुम्ही भाग्यवान मुली आहात. माझे पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. मी पोलीस अधिकारी झाले. तुम्हाला पोलीस व्हायचे का ? यावर पन्नास टक्के मुलींनी वर हात केला. शाब्बास, तुम्ही बहादूर आहात. तुमचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ सौरभ त्रिपाठी शिकले म्हणून पोलीस अधिकारी म्हणून तुमच्यासमोर उभे आहेत. तुम्ही खूप अभ्यास करा, मोठ्या व्हा, असा विश्वास व्यक्त करुन रश्मी शुक्ला यांनी बालपणातील काही पैलू उलगडले.