शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

अहमदनगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून २७ लाखांची विदेशी दारू जप्त

By अण्णा नवथर | Published: July 20, 2023 11:51 AM

नगर कल्याण रोड विदेशी दारू चा एक टेम्पो नगर मध्ये येत असल्याची माहिती गुप्त बातमीदार मार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली.

अहमदनगर -  नगर कल्याण रोड वरील नेप्ती नाका येथे सापळा लावून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणारा आयशर टेम्पोसह दोघांना बुधवारी सायंकाळी ताब्यात घेतले. आरोपींकडून गोवा येथून विक्रीसाठी आणलेली तब्बल २७ लाख ४४ हजार रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याची मोहीम स्थानिक गून्हे शाखेने हाती घेतली आहे.

नगर कल्याण रोड विदेशी दारू चा एक टेम्पो नगर मध्ये येत असल्याची माहिती गुप्त बातमीदार मार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यांनी लगेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पाठवून नगर कल्याण रोडवरील नेपती नाका येथे सापळा लावला. त्यावेळी एक आयशर टेम्पो येताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी चालकास थांबण्याचा इशारा केला असता त्याने टेम्पो रस्त्याच्या बाजूला उभा केला. पोलिसांनी टेम्पोची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये विविध प्रकारची विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले

पोलिसांनी याबाबत चालकांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलीही माहिती नव्हती. या प्रकरणी बाबू लखूभाई राठोड (रा. राजकोट, गुजरात) व सिद्धेश संदीप खरमाळे ( रा.भांडगाव ता. पारनेर )अशा दोन जणांना ताब्यात घेण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शना खालील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, अतुल लोटके देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, सचिन आडबल, विजय ठोंबरे, संतोष लोंढे, संदीप जाधव, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ ,अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड  आदींच्या पथकाने केली.