शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

सरकारने संशोधनासाठी विद्यापीठांना निधी द्यावा

By admin | Published: April 23, 2016 11:35 PM

संगमनेर : भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी संधी असल्याने बुद्धिमत्तेचा वापर विकासासाठी करून देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी योगदान द्यावे.

संगमनेर : भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी संधी असल्याने बुद्धिमत्तेचा वापर विकासासाठी करून देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी योगदान द्यावे. त्याकरिता केंद्र व राज्य सरकारने संशोधनासाठी विद्यापीठांना जास्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शनिवारी आयोजित अमृतवाहिनी अभियांत्रिकी व अमृतवाहिनी औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या पदवीग्रहण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, लक्ष्मण कुटे, दुर्गाताई तांबे, सत्यजित तांबे, शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. पाटील, प्रा. व्ही. बी. धुमाळ, अशोककुमार मिश्रा, परीक्षा विभाग प्रमुख वैभव हासे व प्रा. सय्यद आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, देशाला आर्थिक महासत्ता होण्यासाठी अजूनही अनेक क्षेत्रात मोठ्या संशोधनांची गरज आहे. विद्यार्थ्यांनी सतत संशोधन वृत्ती जोपासली पाहिजे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दूरदृष्टीतून सुरू केलेल्या या महाविद्यालयाने मागील ३० वर्षांत गुणवत्तेमुळे देशात मोठा लौकीक निर्माण केला आहे. सर्वांगीण व्यक्तिमत्व असलेले विद्यार्थी येथे घडत आहेत. भारतामध्ये नैसर्गिक साधन सामग्री जरी कमी असली, तरी बुध्दिमत्ता अफाट आहे. त्याचा वापर संशोधनासाठी होवून विद्यार्थ्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात जावून गुणवत्तापूर्वक काम करण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले. थोरात यांनी पदवी ग्रहण हा विद्यार्थी जीवनातील मोठा क्षण असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी जगाच्या बाजारपेठेत आत्मविश्वास व गुणवत्तेने काम करण्याचे आवाहन केले. अभियांत्रिकीच्या ४५ व औषधनिर्माण शास्त्रच्या ३० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.जी.जे. विखे यांनी केले. समारंभास अ‍ॅड. माधव कानवडे, मीरा चकोर, भाऊसाहेब कुटे, प्रांताधिकारी संदीप निचीत, अजय फटांगरे, संपत गोडगे, नामदेव गुंजाळ, केशव जाधव, एस.टी. देशमुख, आर.बी. सोनवणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.धनवंती काळोखे व मयुरी गाडे यांनी केले. प्राचार्य डॉ. संजय चौधरी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)