शहरं
Join us  
Trending Stories
1
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
2
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
3
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
4
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
5
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
6
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
7
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
8
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
9
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
10
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
11
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
12
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
13
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
14
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
15
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
16
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
17
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
18
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
19
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
20
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल

दरोडेखोरांची टोळी जेरबंद

By admin | Published: August 31, 2016 12:26 AM

कोपरगाव: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीस शहर पोलिसांनी जेरबंद केल्याची घटना संवत्सर शिवारात घडली.

कोपरगाव: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीस शहर पोलिसांनी जेरबंद केल्याची घटना संवत्सर शिवारात घडली. याप्रकरणी तिघा तरूणांना अटक करण्यात आली असून फरार दोघांचा तपास पोलीस करीत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास कोपरगाव-वैजापूर महामार्गावर संवत्सर शिवारातील रेल्वे पुलानजीक रणजीत धरमसिंग मुळेकर (वय २२), सागर चंद्रभान घाडगे (वय २५) व वसंत अशासशस्त्र साळूंके (वय २०) सर्व रा. शिवाजीनगर, दहेगाव बोलका हे त्यांच्या दोन अज्ञात साथीदारांसह लाठ्या, कंबरेस खोसलेली कुकरी, चाकू सारखे घातक शस्त्र घेवून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने रस्त्याच्या कडेला दबा धरून बसले होते. दरम्यान रात्रीची गस्त घालताना ही टोळी शहर पोलिसांच्या निदर्शनास आली. दरम्यान पोलिसांनी त्यांना हटकल्यावर संशय आल्याने झाडाझडती घेतली असता लाकडी दांडके, काठ्या, लोखंडी कुकरी, चाकू अशी हत्यारे त्यांच्याजवळ सापडली. पोलिसांनी त्यांची धरपकड केली. मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दोघे जण फरार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी तिघा आरोपींकडील लाल रंगाची बजाज डिस्कव्हर (क्रमांक एम.एच.२०, पी.आर.८१४५) दुचाकी, १५ हजाराची रोकड तसेच सर्व हत्यारे जप्त करून शहर पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिपक फुंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एस. देवरे, उपनिरीक्षक एस. जी. जोशी यांनी भेट दिली. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.(प्रतिनिधी)