शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

पन्नास हजारांत घ्या... बोगस डिग्रीचे प्रमाणपत्र, रॅकेट उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 7:26 AM

दहावी, बारावीसह पदवीच्या बनावट प्रमाणपत्रांची ५० ते ६० हजारांना विक्री करणारे रॅकेट तोफखाना पोलिसांनी उघड केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : दहावी, बारावीच्या बनावट गुणपत्रिका विक्रीप्रकरणी अटक केलेल्या आरोपीच्या बालिकाश्रम राेडवरील रुद्र एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये तब्बल १८० बनावट प्रमाणपत्रे पाेलिसांच्या हाती आली आहेत. यामध्ये दहावी, बारावीच्या गुणपत्रिकांसह बीएएमएस, बीएचएमएस, डीएमएलटी कोर्सच्या प्रमाणपत्रांचा समावेश आहे.

दहावी, बारावीसह पदवीच्या बनावट प्रमाणपत्रांची ५० ते ६० हजारांना विक्री करणारे रॅकेट तोफखाना पोलिसांनी उघड केले आहे. या प्रकरणी अशोक नामदेव सोनवणे (वय ३७, रा. द्वारकाधीश वसाहत, आलमगीर, भिंगार, अहमदनगर) याला अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान सुरुवातीला त्याच्या नावे आलेल्या कुरिअरमध्ये चार बनावट गुणपत्रिका आढळून आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या रुद्र एज्युकेशन इन्स्टिट्यूटवर छापा मारला. त्यावेळी त्यांना दहावी, बारावीसह विविध शाखांच्या पदव्यांची १८० बनावट प्रमाणपत्रे आढळली. 

धुळ्यातून दिल्लीच्या संपर्कात

आरोपी सोनवणे हा २०१७ मध्ये धुळ्यात पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत कौशल्य विकास केंद्र चालवीत होता. यानिमित्ताने त्याचा दिल्ली येथील बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांशी संपर्क आला. दिल्लीहून कौशल्य विकास योजनेचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे बनावट प्रमाणपत्र मागवून तो विकत होता. यातून त्याला झटपट पैसे कमविण्याचा मार्ग सापडला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी