शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

महिला आयोग वाढविणार मुलींचे मनोधैर्य

By admin | Published: July 20, 2016 11:41 PM

कर्जत/मिरजगाव : कोपर्डी घटनेनंतर खचलेल्या महिला व मुलींचे मनोधैर्य वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग बुधवारी कोपर्डीत धावून आला.

कर्जत/मिरजगाव : कोपर्डी घटनेनंतर खचलेल्या महिला व मुलींचे मनोधैर्य वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग बुधवारी कोपर्डीत धावून आला. आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विजया रहाटकर यांनी कोपर्डीच्या भैरवनाथ मंदिरात सर्व शाळा, महाविद्यालयातील मुली, पालक व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या गावात पुढील शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मोबाईलवरून दिले.गावातील पालक मुलींना शाळा, महाविद्यालयात पाठविण्यास घाबरत आहेत. या गावातील महिला व मुलींचे मनोधैर्य खचले असल्याने त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी आयोगाने प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकरणाची बालहक्क आयोगानेही दखल घेतल्याचे त्यांनी सांगितले. गावातील मुलींच्या मनातील भीती दूर होण्यासाठी डॉ. मोनाली देशपांडे, गयाबाई कराड, मंगला सिवरा यांनी विविध घटनांचे दाखले देऊन मुलींचे, पालकांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला. डॉ. रहाटकर यांनी मुलींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांच्या पालकांशी चर्चा करून या गावात एस. टी. बसची सुविधा तातडीने सुरू करण्याचे,कोपर्डी व कुळधरण येथे आजपासूनच पोलीस मदत केंद्र सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या गुन्ह्याच्या खटल्यासाठी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली आहे.