शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
2
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
3
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
4
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
5
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
6
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
7
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
8
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
9
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
10
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
11
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
12
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
13
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
14
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
15
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
16
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
17
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
18
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
19
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
20
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

पर्यटकांना खुनावतोय भातोडीचा वैभवशाली इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 5:51 PM

नगर तालुक्यातील भातोडी गाव  जगाच्या नकाशावर झळकताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत करणारे हे गाव काही वर्षे जरी दुर्लक्षित असले तरी आज मात्र गावकरी, राजकीय नेते, समाजसुधारक, समाजसेवक, इतिहासप्रेमी यांच्या अपार परिश्रमाने हे गाव पर्यटनस्थळ म्हणून नावरूपाला येत आहे. ऐतिहासिक नृसिह मंदिर, भातोडीची इतिहास प्रसिद्ध लढाई, ऐतिहासिक तलाव, कलावंतनीचा महल यामुळे भातोडीला ऐतिहासिक महत्त्व आले आहे.

जागतिक पर्यटन दिन विशेष/ योगेश गुंड/  केडगाव : नगर तालुक्यातील भातोडी गाव  जगाच्या नकाशावर झळकताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत करणारे हे गाव काही वर्षे जरी दुर्लक्षित असले तरी आज मात्र गावकरी, राजकीय नेते, समाजसुधारक, समाजसेवक, इतिहासप्रेमी यांच्या अपार परिश्रमाने हे गाव पर्यटनस्थळ म्हणून नावरूपाला येत आहे. ऐतिहासिक नृसिह मंदिर, भातोडीची इतिहास प्रसिद्ध लढाई, ऐतिहासिक तलाव, कलावंतनीचा महल यामुळे भातोडीला ऐतिहासिक महत्त्व आले आहे.नगर व मराठवाड्याच्या हद्दीवर वसलेल्या भातोडीच्या मेहेकरी नदीच्या तीरावर सुमारे ७०० वर्षे पूर्वीचे दगडी शिल्पातील श्री नृसिंहाचे जाज्वल मंदिर आहे. सन १४४० मध्ये कान्हो नरसोजी नावाच्या वीर प्रधानाने हे मंदिर बांधले असल्याचा काही ठिकाणी इतिहासप्रेमी दाखला देतात. मंदिरासमोर दगडी कोरीव कामातील दीपमाळ आहे. नदीवर भव्य घाटही आहे. मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी व इतर संतांची मंदिरे विराजमान आहेत. तसेच नागनाथ श्री काशी विश्वेश्वर व श्री सिद्धेश्वराची मंदिरे आहेत. २०१६-२०१७ मध्ये या मंदिराचा ड वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश झाला होता. नंतर पुढील वर्षी  मंदिर क वर्गात आले. त्यामुळे वॉल कंपाउंड तसेच पेव्हर ब्लॉकची कामे पूर्ण झाली आहेत. पुढील वर्षात सुशोभीकरणाची अनेक कामे प्रस्तावित आहेत.१६२४ मध्ये येथे झालेल्या इतिहास प्रसिद्ध लढाईत शहाजीराजे भोसले यांनी कामगिरी बजावून मोठा विजय मिळविला होता. या दरम्यान  शरीफजी राजे भोसले यांना मोघलांच्या विरोधात लढाई करताना वीरमरण आले होते. त्यांचे समाधीस्थळ भातोडी गावात आहे. ही लढाई इतिहासातील मोठी लढाई समजली जाते. या लढाईत अतिशय चतुराईने शरीफजी राजे भोसले यांनी तलाव फोडून हजारो मोघलांना जमिनीत गाडले होते. या सह ७५० हेक्टर चा ऐतिहासिक तलाव निजामशाही काळात बांधला गेला आहे, तोही पाहण्यासारखा आहे.  गावापासून हाकेच्या अंतरावर बीड जिल्ह्याच्या सीमेवर कलावनतीचा महाल आहे. त्याची पडझड झाली असून त्याची दुरूस्ती करण्याची गरज आहे. सन १५८८ मध्ये सलाबत खानने बांधलेला हत्ती बारव प्रसिद्ध आहे. असे हे पुरातन आणि ऐतिहासिक गाव पर्यटकांना खुणावत आहे. शासनानेही येथील पर्यटनस्थळांचा गांभीर्याने विकासकामांत समावेश करणे गरजेचे आहे. मंदिराचा समावेश ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकासात समाविष्ट करण्यात आला आहे.  लवकरच मंदिर परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. कामासाठी सर्वांचे सहकार्य लाभत आहे. शासनाने तीर्थक्षेत्राचा निधी लवकर द्यावा, असे भातोडीचे सरपंच संगीता नेटके यांनी सांगितले. 

    

टॅग्स :environmentपर्यावरणAhmednagarअहमदनगर