शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
2
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
3
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
4
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
5
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
6
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
7
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
8
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
9
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
10
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
11
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
12
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
14
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
15
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
16
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
17
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
18
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
19
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
20
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना मिळणार नवीन कारभारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 10:54 AM

प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध होणार, कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा.

प्रशांत शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर - जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 84 ग्रामपंचायती आणि विविध कारणांनी रिक्त असलेल्या 155 सदस्यांच्या जागांसाठी पुढील महिन्यांत निवडणूक होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासाठी तयारी सुरू केली असून आज (मंगळवार) वार्डनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर 19 जुलैला वार्डनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा करू शकते.  

दरम्यान, जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकीत चुकीची प्रभागरचना झालेल्या, तसेच बहिष्कार व अन्य कारणामुळे निवडणूका न होवू शकलेल्या राज्यातील सुमारे 1 हजार 588 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तसेच सदस्य अथवा थेट सरपंच यांच्या रिक्त असणार्‍या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यासाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वापरलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याच्या सुचना राज्य निवडणूक आयोगाने काढल्या आहेत. 

त्यानूसार नगर जिल्ह्यात 84 ग्रामपंचायत आणि 155 ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी आज प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर 15 जुलैपर्यंत त्यावर हरकती घेण्यास मुदत राहणार असून 19 तारखेला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

जिल्ह्यातील 155 ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा जानेवारीपासून रिक्त आहेत. यामध्ये काही निधन तर काही राजीनामा दिलेल्या सदस्यांचा समावेश आहे. अकोले तालुक्यात सर्वाधिक 69 सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यानंतर शेवगाव 19, संगमनेर 14 आणि नेवासा तालुक्यातील 10 सदस्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात मागील साडेचार महिन्यांपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. 16 मार्च ते 6 जूनपर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होती. त्यानंतर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी 6 जुलैपर्यंत आचारसंहिता लागू होती. दरम्यान, ही आचारसंहिता सुरू असतानाच निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केला होता. 

त्यामुळे विधानसभा निवडणुका झाल्यानंतरच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याचा अंदाज होता. मात्र, अचानक राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत संपणार्‍या ग्रामपंचायती आणि रिक्त असणर्‍या सदस्यांच्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्व तयारी सुरू केल्याने जिल्ह्यात 84 ग्रामपंचायतमध्ये विधानसभे आधी ग्रामपंचायत निवडणूका होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 84 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. यामध्ये नेवासा तालुक्यातील 26, कर्जत 17, अकोले 8, नगर 7, संगमनेर 2, कोपगाव 3, राहाता 1, श्रीरामपूर 2, राहुरी 3, शेवगाव 5, पाथर्डी 4, जाखमेड 3, श्रीगोंदा 1 आणि पारनेर 1 यांचा समावेश आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर