आयुर्वेद चौकातील नाथकृपा मंगल कार्यालयात नगर येथील गाडळकर-हजारे यांच्या परिवारातील वधु-वराचा शनिवारी रात्री साखरपुडा झाला. या मंगलकार्यास आम्ही येतो पण तेथे भारत-पाक क्रिकेट सामना पाहण्याची सोय करण्याचा हट्टच नातेवाईकांनी धरला.व्यासपीठाच्या बाजूला मोठी स्क्रीन लावून वधूकडील मंडळींनी सर्वांची इच्छा क्षणार्धात पूर्ण केली. साखरपुडा सुरू असताना नातेवाईक-इष्ट-मित्र परिवाराने भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा आनंद लुटला.थेट लग्न मंडपात भारत-पाक क्रिकेट सामन्याचा अनोखा फिवर दिसून आला.
लग्नमंडपी रंगला भारत-पाक सामना
By admin | Published: March 20, 2016 12:43 AM