शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
2
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
3
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
4
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
5
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
6
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
7
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
8
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
9
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
10
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
11
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
12
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
13
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
14
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
15
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
16
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
17
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
18
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
19
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
20
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रवादी-भाजपची अंतर्गत हातमिळवणी

By admin | Published: April 23, 2016 11:37 PM

अहमदनगर : राज्यातील युतीच्या सत्तेच्या माध्यमातून महापालिकेतील विरोधकांनी चाळीस कोटी रुपयांच्या निधीला स्थगिती मिळवित सत्तापक्ष राष्ट्रवादीची कोंडी केली.

अहमदनगर : राज्यातील युतीच्या सत्तेच्या माध्यमातून महापालिकेतील विरोधकांनी चाळीस कोटी रुपयांच्या निधीला स्थगिती मिळवित सत्तापक्ष राष्ट्रवादीची कोंडी केली. मात्र भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही स्थगिती उठविण्यात सत्ताधारी राष्ट्रवादीने यशस्वी खेळी खेळली. राष्ट्रवादी-भाजपच्या अंतर्गत हातमिळवणीमुळे सेनेत अस्वस्थता वाढली आहे. भाजपचा मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीला हा निधी खर्च करण्याची परवनागी त्याशिवाय मिळूच शकत नाही असे मत सेनेच्या गोटातून व्यक्त करण्यात आले. महापालिकेत युतीची सत्ता असताना नगर महापालिकेला मूलभूत सोईसुविधेसाठी हा निधी मिळाला होता. महापालिकेत नंतर सत्तांतर झाले. राष्ट्रवादीची सत्ता आली असली तरी जूनमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत सत्ता हस्तगत करण्यासाठीचा डाव सेनेने मांडला आहे. त्यामुळे आपल्याच कार्यकाळात हा निधी मिळावा यासाठी सेनेने चाळीस कोटी रुपये खर्चाला शासनाकडून स्थगिती मिळविली. ही स्थगिती मिळविताना राज्यातील युतीच्या सत्तेचा फायदा झाला.मात्र ही स्थगिती उठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटू असे आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची तारीख मागितली. पण ही तारीख मिळालीच नाही. त्यामुळे महापौर कळमकर यांना नाईलाजाने खंडपीठात धाव घ्यावी लागली. राष्ट्रवादीच्या प्रदेश पातळीवर पदाधिकारी असलेल्या स्थानिक नेत्याने अखेरचा प्रयत्न म्हणून भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याला हाताशी धरले. त्या माध्यमातून अनेकदा मुंबई वाऱ्या झाल्या. प्रभाग तीनच्या पोटनिवडणुकीत सेनेचे नेते, नगरसेवक गुंतले असताना मंत्रालयात या नेत्याच्या माध्यमातून निधी खर्चाची स्थगिती उठविण्यासाठी कागदपत्रे रंगविण्यात आली. त्यामुळेच राष्ट्रवादीचे नेते मुंबईत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचू शकले अशी चर्चा सेनेच्या गोटातून ऐकावयास मिळते. चाळीस कोटी रुपये निधी खर्चाला मिळालेली स्थगिती त्याशिवाय मिळूच शकत नाही असा दावा सेनेच्या गोटातून केला जात आहे. (प्रतिनिधी)जगताप-कळमकर संघर्षासाठी युतीची चालमहापालिकेत युतीचे नेतृत्व करणाऱ्या नगरसेवकांची दादा कळमकर यांनी अनेकदा भेट घेतली. पालकमंत्री राम शिंदे यांनाही दादा कळमकर अनेकदा भेटले. राष्ट्रवादीत आमदार जगताप यांच्यानंतर कोणीतरी नेतृत्व पुढे यावे यासाठी युतीच्या नगरसेवकांनी निधीची स्थगिती उठविताना ‘माईल्ड’ भूमिका घेण्याचे मान्य केले. त्यामुळेच कळमकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचू शकले. जगताप-कळमकर यांच्यात राजकीय संघर्ष सुरू व्हावा यासाठीच भाजपाच्या माजी पदाधिकाऱ्याने स्थगिती उठविण्यात पुढाकार घेतल्याची चर्चा आहे.