शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

राष्ट्रवादीच्या मुंबईत आज मुलाखती

By admin | Published: August 26, 2014 11:09 PM

अहमदनगर: आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी निश्चितीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत बुधवारी होत आहे.

अहमदनगर: आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी निश्चितीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत बुधवारी होत आहे. मुलाखतीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार हे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती यावेळी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी दिली. गत आठवड्यात पक्षाने इच्छुकांचे अर्ज मागविले होते. जमा झालेले अर्ज प्रदेश समितीकडे पाठविण्यात आले आहे. दि. २७ रोजी शरद पवार हे स्वत: उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. जिल्ह्यातून ६२ जणांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. या सर्वच इच्छुकांना पक्षाने मुलाखतीसाठी मुंबईत बोलविले आहे. पक्षाचे जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदार तसेच ज्येष्ठ नेत्यांनाही मुंबईतील बैठकीसाठी बोलविण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग हेही मुलाखतीप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. माजी मंत्री शंकरराव कोल्हे, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनाही मुंबईत बोलविण्यात आले आहे. बबनराव पाचपुते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पूर्वीच पक्षातून गेलेले घनशाम शेलार यांनी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. तेही मुलाखतीसाठी जाणार आहे. पाचपुते यांच्या पराभवासाठी पवार यांनी श्रीगोंदा मतदारसंघातील नेत्यांची पुण्यात बैठक घेतली होती. मुंबईतही पाचपुते यांच्याविषयी बैठकीत चर्चा केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली. कॉँग्रेसच्या ताब्यातील नगर शहर व कर्जत-जामखेड मतदारसंघावर राष्ट्रवादीने हक्क सांगितला आहे. या मतदारसंघातून इच्छुकांना मुलाखतीला बोलविले आहे. त्यामुळे मतदारसंघ अदलाबदलीच्या विषयीही मुलाखतीनंतरच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादी-कॉँग्रेसमध्ये जागा वाटपात असलेले मतभेद अजूनही मिटलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका काय? याची चाचपणी मुलाखतीनंतर केली जाणार आहे. त्यासाठीच पवार यांनी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांना मुंबईत बोलविले आहे.